(आरोपी विशाल विलासराव खाडे, अमजद खाँ शेरखाँ पठाण व सय्यद अझर सय्यद नुर पोलीसांच्या ताब्यात)
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.६, हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातुन एका खाजगी गोदामातुन रिसोड जि. वाशिमच्या दिशेने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ११२ क्विंटल रेशनचा धान्यसाठा हिंगोली पोलीसांनी ५ आँगष्ट बुधवार रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धाड टाकुन एक ट्रक व दुचाकी एकुण १७ लाख ८७ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन हिंगोली जि.प.च्या माजी अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्यासह ७ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीतांनी संगणमत करुन राशन दुकानातील शासनाकडून प्राप्त झालेला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात करीता मिळालेला तांदुळ,गव्हु व हरभरा दाळ काळ्या बाजारात अवैधरीत्या चढ्या दराने सय्यद आझम सय्यद नुर यास खाडे यांच्या राशन दुकानामध्ये शासकीय राशनचे पोते खाजगी पोत्यामध्ये पल्टी मारतांना ट्रक क्रमांक एम एच ३७ टी १६०७ मध्ये राशनचा माल भरतांना मिळुन आला तसेच आरोपी अमजद पठाण याच्या घरी अवैधपणे राशन मालाची साठवणुक करुन ठेवलेले व घरी अवैधपणे दोन राशन वाटप मशिन असा एकुण १७ लाख ८७ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन हि कारवाई हिंगोली पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने केली आहे.हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून सेनगांव पोलीस स्टेशन ला माजी जि. प.अध्यक्षा सरोजनी खाडे नातु विशाल विलासराव खाडे,अमजद खाँ शेरखाँ पठाण रा. सेनगांव,सय्यद अझर सय्यद नुर रा. रिसोड जि.वाशिम,ट्रकचालक समिर खान रा. मंगरुळपीर जि वाशिम, सय्यद आझाम सय्यद नुर रा.रिसोड,ट्रक मालक श्याम बाहेती रा.वाशिम या सात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आठ दिवसापुर्वीच हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने खाडे कुटुंबातील सतिश खाडे यांच्या टिनपत्राच्या शेडमध्ये अवैध गुटख्यावर धाड टाकत तब्बल ११ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता आणि आज अवैध राशनचा माल काळ्या बाजारात विक्रीस नेतांना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर हे करीत आहे.

