सोनई । प्रतिनिधी : ( मोहन शेगर )
नगरला धान्य विकण्यासाठी घेऊन चाललेल्या व्यापार्याच्या मुलास खोट्या गुन्ह्यात गोवून भवितव्य बरबाद करण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाहीतर त्यास ओलिस ठेवून ‘गुगल पे’द्वारे तब्बल 80 हजारांची खंडणी उकळण्याचा प्रताप शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचार्यांनी केल्याची तक्रार राज्याच्या गृह सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात खरवंडी (ता. नेवासे) येथील महाविद्यालयीन युवक वैभव विलास उगले याने म्हटले आहे की, तो महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना वडिलांच्या छोट्याशा किराणा दुकानात त्यांना व्यवसायात मदत करत असतो. ग्रामीण भागात असल्याने लोक त्यांना किराणा सामान खरेदी करण्याच्या बदल्यात रोख रकमेऐवजी धान्य, कडधान्ये, तेलबिया आदी साहित्य देतात. या माध्यमातून जमा झालेले धान्य नगरच्या आडत व्यापार्याला विकून त्याची रोख रक्कम करायची, असा त्यांचा पूर्वापार व्यवसाय आहे.
दि. 8 जुलै रोजी वडिलांच्या सूचनेवरून जमा झालेले धान्य गोण्यांत भरून भाडोत्री वाहनातून नगरला घेऊन जात असताना, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शनिशिंगणापूर फाट्यावर 4141 क्रमांकाच्या मोटरसाईकलवरुन आलेल्या साध्या वेशातील शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्यांनी त्यांचे वाहन थांबवून गाडीत काय माल आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी गाडीसोबत असलेल्या वैभव उगले याने गाडीत धान्य असून ते नगरला विकण्यासाठी चालविले असल्याचे सांगितले. परंतु या पोलिस कर्मचार्यांनी हा रेशनिंगचा माल असून गुन्हा दाखल करण्यासाठी गाडी मालासह शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात घेण्यास बजावले. उगले याने हा माल रेशनचा नसल्याचे सांगूनही या पोलिस कर्मचार्यांनी चालकाला दमदाटी करत गाडी पोलिस ठाण्याच्या दिशेने वळविण्यास भाग पाडले.
नगर-औरंगाबाद महामार्गापासून शनिशिंगणापूर रस्त्यावर सुमारे एक-दीड किलोमीटरपर्यंत गाडी गेली असता एका निर्जन ठिकाणी मोकळ्या शेतात गाडी घालण्यास सांगण्यात आले. शेतात आतमध्ये काही अंतर गेल्यानंतर झाडांच्या आडोशाला नेऊन गाडी उभी करण्यास त्यांना बजावण्यात आले. निर्जन ठिकाणी आल्यावर एका पोलिस कर्मचार्याने गाडीची चावी, तसेच उगले यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांच्यापासून बाजूला जाऊन उभा राहिला. दुसर्या पोलिस कर्मचार्याने ‘गाडी घेऊन पोलिस स्टेशनला गेलो, तर प्रकरण मिटवायला कमीत कमी पाच लाख रुपये द्यावे लागतील. त्यापेक्षा इथेच अडीच लाखांत मिटवून टाकू’, अशी बतावणी केली. परंतु आमचा माल रेशनचा नसल्याने प्रकरण मिटविण्याचा प्रश्नच येतो कुठे, असा प्रतिप्रश्न उगले यांनी केला असता पोलिस कर्मचार्याने अर्वाच्च भाषा वापरुन तुमचा माल रेशनचाच आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो, खोट्या गुन्ह्यात अडकवून नाहक जेलमध्ये सडत पडशील, तुझ्या पुढील शिक्षण आणि नोकरीचे भवितव्य धोक्यात येईल’, अशी धमकी देऊन घाबरवून गर्भगळीत केले. त्याने एवढे पैसे जवळ नसल्याने देऊ शकत नसल्याचे सांगताच त्याच्या वडिलांना बोलावून घेण्यास सांगितले. यावेळी पहिल्या पोलिस कर्मचार्याने वैभवचा मोबाईल परत देताना वडिलांना गाडी पंक्चर झाल्याचे सांगून बोलावून घेण्यास बजावले. वैभवचे वडील घटनास्थळी आल्यावर त्यांना खरा प्रकार समजताच, ते पुरते हादरले. त्यांनी गयावया करत आम्ही गरीब लोक असून कुठलाही अवैध व्यवसाय करत नसल्याचे सांगूनही या दोन पोलिस कर्मचार्यांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही.
पैसे न दिल्यास पोलिस अधिकाराचा दुरुपयोग करून आपल्या मुलाचे भवितव्य खराब तर करतीलच, शिवाय भाडोत्री वाहनवरही कारवाई करून पोलिस ठाण्याच्या आवारात वाहन नाहक सडवून डोक्याला ताप करतील, या भीतीने हवालदिल झालेल्या उगले यांनी नमते घेताच, कमीतकमी एक लाख रुपये दिले, तरच तुमची यातून सुटका होईल, असे त्यांना सांगण्यात आले. उगले यांनी त्यांच्या शेजारी राहणार्या व्यक्तीला फोन करून घडलेला प्रकार कथन करत एक लाख रुपये उसने मागितले. ती व्यक्ती गावात ओळखीच्या लोकांकडून 60 हजारच जमा करू शकली. ही बाब उगले यांनी पोलिसांना सांगितली असता शेवट ऐंशी हजार रुपये तरी द्यावेच लागतील, असे सांगून अजून 20 हजार रुपयांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. त्यामुळे अखेर उगले यांनी जवळे (ता. पारनेर) येथील त्यांच्या जावयास फोनवरुन त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग कथन करत गुगल-पे द्वारे वीस हजार रुपये पाठविण्याची तयारी दर्शवली. कहर म्हणजे यातील पहिल्या पोलिस कर्मचार्याने 9561948268 या क्रमांकावर दोन्ही रकमा गुगल पे द्वारे पाठविण्यास बजावले. याप्रमाणे दोन्ही रकमा मिळून ऐंशी हजारांची रक्कम मिळाल्याची खात्री पटल्यानंतर या पोलिसांनी वाहनाची चावी देऊन त्यांची सुटका केली.
थोडे सावरल्यावर वैभवने घडलेला प्रकार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांना कथन केला. माळवदे यांच्या सूचनेप्रमाणे उगले यांनी तक्रार केली असून याप्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
तालुक्यात पोलिस यंत्रणा बेलगाम:
शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पो.नि.गुलदस्त्यात?

नेवासे तालुक्यातील पोलिस यंत्रणेला कोणाचाच धाक राहिला नसून, ती बेलगाम बनत चालली आहे. मुलाला ओलीस ठेऊन वडिलांकडून खंडणी उकळण्याचा घडलेला हा अत्यंत किळसवाणा प्रकार संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलाच्या गौरवशाली परंपरेस काळिमा फासणारा असल्याने संबंधित पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करुन निलंबित झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.- संभाजी माळवदे, अध्यक्ष नेवासे तालुका काँग्रेस.
शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पो.नि.गुलदस्त्यात?
आमच्याकडे तक्रार नाही या संदर्भात शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्याशी संपर्क साधला असता, आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.शनिशिंगणापूर देवस्थान बंद असल्यामुळे पोलिसांची आर्थिक उलाढाल बंद असल्यामुळे पोलीस सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून अशी जबरदस्ती वसुली करत आहे जिह्ल्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक यांनी लक्ष घालून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी सर्व सामान्य जनतेतून मागणी होत आहे