मुरूड । प्रतिनिधी (विकास मेहेतर):
*शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.आमदार.महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने महाराष्ट्रातील तसेच देशातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा.श्री सुरेंद्रदादा म्हात्रे,शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख मा.श्री.राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
त्यावेळी संघटक सतिश पाटील, खजिनदार सुरेश म्हात्रे, शिवसेना नेते संतोष निगडे,उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, शहर प्रमुख संदिप पालकर,विभाग प्रमुख शंकर गुरव,नंदूशेठ पाटील, विभाग प्रमुख सुबोध राऊत, उपतालुका प्रमुख मनिष पाटील, महिला तालुका प्रमुख पल्लवी पाटील, महिला शहर प्रमुख तनुजा पेरेकर,आप्पा पिंगळे तसेच सर्व शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

