shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विजेची समस्या सोडवण्यासाठी कोरचीत चक्काजाम सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत जनआंदोलन..!!



कोरची, ता.४ :- गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त्‍ झालेल्या नागरिकांनी आज सकाळी  ११ वाजतापासुन कोरची- कुरखेडा मार्गावरील झनकारगोंदी फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला . सकाळपासून सुरू झालेले हे आंदोलन रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू होते.

 नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कोरची तालुक्याला पूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड येथून वीजपुरवठा केला जात होता. परंतु गोंदिया जिल्हा महावितरण कार्यालयाने कोरची तालुका गडचिरोली जिल्ह्याचा भाग असल्याचे सांगून कोरची तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडित केला. तेव्हापासून या तालुक्याला कुरखेडा येथून वीजपुरवठा केला जात आहे. कोरची तालुक्याला ३३ केव्ही विजेची आवश्यकता आहे. मात्र, पुरवठा केवळ १८ केव्हीचा होत असल्याने चोवीस तासांपैकी १८ तासभार नियमन, तर केवळ ६ तास वीजपुरवठा सुरु आहे.

या विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कोरची तालुक्यातील विजेची समस्या सोडवावी, तालुक्यात बीएसएनएल नेटवर्कसाठी टॉवर उभे करावे, तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, इत्यादी मागण्यांचा आंदोलनकर्त्यांनी पुनरुच्चार केला.या आंदोलनाचे नेतृत्व सर्वपक्षीय तालुका विकास समितीचे अध्यक्ष श्मालाल मडावी, उपाध्यक्ष नसुरुद्दीन भामानी, सचिव नंदकिशोर वैरागडे, प्रतापसिंह गजभिये, मनोज अग्रवाल, आनंद चौबे आदींनी केले. 
कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, कोरचे ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले हेसुद्धा यावेळी परिस्थितीवर नजर ठेवून होते.
close