shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईत सी एफ एल बल्ब चोरीचे रॅकेट...! सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे भुरट्या चोराचे प्रमाण वाढले..!!

सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर ):

सोनई--सोनई येथील लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने गावामध्ये चोरीचे प्रमाण वाढत असून घराबाहेर नागरिकांनी स्वतःहा लावण्यात आलेल्या व  महागडे सी एफ एल बल चोरीची घटना घडली आहे. ही चोरी छोटी असली तरी यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या बाबत सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती की चांभार गल्लीतील रहिवासी संतोष मोहन तेलोरे यांच्या घरा समोर लावण्यात आलेला एकशे दहा रुपये किमतीचा सीएफएल बल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. तशी तक्रार सोनई पोलिस ठाण्यात संतोष तेलोरे यांनी दिली आहे.

जुलै व ऑगस्ट या महिन्यात प्रत्येकी एक बल्ब चोरी गेल्याची तक्रार दाखल करून २३०/- रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानिमित्ताने चोरी  छोटी असली तरी गावात दुकाना समोर, घरासमोर लावण्यात आलेल्या महागडे बल ची किंमत पाहता दररोज चोरटा हजारो रुपये कमवत असण्याची दाट शक्यता आहे. तरी या चोरीचा तपास लावण्याची मागणी संतोष तेलोरे यांनी केली आहे.
    
गावात एका पोलीस अधिकारी व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही फुटेज बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. सार्वजनिक विजेच्या खांबावरील गेलेल्या ठिकाणी बल्ब लावण्याची आवश्यकता असून त्याची आजची अवस्था "असून नसल्यासारखी  झाली असून चोरटे याचाच फायदा घेत आहे. छोट्या-मोठ्या चोरीबाबत मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे या रात्री-अपरात्री मोकाट फिरणाऱ्या वर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी.
      प्रकाश शेटे,
भाजपा,उपाध्यक्ष, नेवासा.
close