shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज ..!



खर्डा । प्रतिनिधी  :
जामखेड तालुक्यातील तेलंगशी जि.प.केंद्रित प्रा.शाळा येथे ॲप इन्स्टाॅलेशन करुन शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे समुपदेशन.काळाप्रमाणे जो बदलतो,तोच खरी प्रगती करु शकतो. ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे.असे मनोगत अहमदनगर जि.प.चे माजी जि.प.सदस्य तथा तेलंगशीचे विद्यमान सरपंच सुभाष जायभाय यांनी व्यक्त केले आहे.

ऑनलाईन शाळा या उपक्रमा अंतर्गत  ॲप इन्स्टाॅलेशन करुन योग्य वापराबाबत विद्यार्थी व पालक यांना शिक्षकांनी प्रत्यक्ष येऊन जे समुपदेशन केले याबद्दल तेलंगशी शाळेच्या सर्व शिक्षकांचे सरपंच सुभाष जायभय यांनी कौतुक केले.
विद्यार्थी व पालकांनी कोरोना आजाराची भिती मनातून काढून टाकावी, माञ योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढाळे यांनी केले.
यावेळी ॲप वापराबाबत विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल फोनचा ठरावीक वेळेतच वापर करुन अध्ययन करावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा, पाठ्यपुस्तकांचाही शिकण्यासाठी वापर करावा  याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

मोबाईल नसणार्‍या विद्यार्थ्यांनाही घरचा अभ्यास देण्यात आला.शाळेत आल्यानंतर एक वेगळाच आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यांवर ओसंडून वाहत होता. यावेळी शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्स) ठेऊन, सॅनिटायझर व मास्क वापरणे या नियमांचे पालन करण्यात आले.सदर उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम जावीर,पदवीधर शिक्षक ज्ञानदेव क्षिरसागर,संतोष गोरे,अनंता गायकवाड ,विजयकुमार रेणुके ,संजय राठोड ,सुशेन चेंटमपल्ले,अशितकुमार घरडे,लक्ष्मी जायभाय यांनी परीश्रम घेतले.
close