shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा लातूर कोरोना रुग्णांच्या बरा होण्याचा दर ५५.५ टक्के...!!




लातूर। प्रतिनिधी :
(रवि बिजलवाड)


ऑगसट ०३ 
लातूर शहर : लातूर जिल्ह्यात सध्या कोरोना कहर बरसणे सुरू झालेले आहे. लातुर जिल्हा आता हाॅटस्पाॅट होत आहे. तब्बल २३११ रुग्ण जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळुन आलेले आहेत. कोरोनाच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ५५.५ टक्के झालेला आहे. त्याप्रमाणे कोरोनामुळे झालेल्या मुत्यूनेही शंभरी गाठलेली आहे.१२८४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मुत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही १०० वर पोहोचलोली असून जिल्ह्यातील कोरोनामुळे होणारया मुत्युचा दर हा सर्वाधिक ४.३ टक्के आहे.लातुर जिल्ह्यामध्ये जुलै २०२० हा महीना खरया अर्थाने कोरोनाच्या उद्रेकाचा महीना ठरला आहे. लातूर जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी सर्वप्रथम ८ पाॅझिटीव्ह रुग्ण निलंगा येथे आढळुन आले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात केवळ १६ रुग्णसंख्या झालेली होती. मे महिन्यात पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्यास सुरु झाली पंरतु संपूर्ण महीन्यात ही संख्या केवळ १२० होती. 

कडकडीत संचारबंदी चा परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही कमीच होती. प्रवास करुन आलेल्या नागरिकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नंतर दिवसेंदिवस वाढत चालेली होती. जुन २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचे २१८ रुग्ण वाढलेले होते.
जूलै महिण्यात संचारबंदी शिथिल झाली, अनेक अस्थापना सुरू झाल्या आणि पर्यायाने कोरोनाचे संकटही अधिक वाढत गेले. जुलै महिन्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तब्बल २३११ वर पोहोचलेली होती. त्यामध्ये केवळ जुलै महिन्यात वाढलेल्या रुग्णांची संख्याच सुमारे १८८८ अशी राहिलेली आहे.लातूर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात कोरोना मुळे केवळ एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता. जुन महिन्यात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर जून महिन्यात १५ रुग्णांचा मृत्यू झाला. जूलै महिन्यात कोरोनाचा कहर लातुरकरांनी अनुभवला. 

एकीकडे रुग्ण संख्या ही वाढत होतीच परंतु मुत्युचे प्रमाणही दररोज वाढत होते. जुलै महिन्यात तब्बल ८२ रुग्णांचे मुत्यू कोरोनामुळे झालेले होते. लातूर जिल्ह्यातुन इतर जिल्यात उपचारासाठी गेलेल्या अणि मुत्यू पावलेल्या रुग्णांची तर अद्याप ही प्रशासनाने नोंदही घेतलेली नाही.काही जण उपचारासाठी पुणे, संभाजीनगर, सोलापूर, हैदराबाद, नांदेड आशा ठिकाणी गेलेले होते.त्यामुळे सध्या १०० रुग्णांचे मुत्यू अधिकुत दिसत असले तरी त्यामध्ये इतर जिल्हात मुत्यु पाठवलेल्यांची संख्या गुहीत धरलेली नाही त्यामुळे मुतांचा आकडा हा अजुनही निश्र्चीतपणे वाढणारच आहे.देशातील कोरोना ग्रस्त रुग्णांच्या मुत्यूचा दर हा २.१ टक्के आहे तर महाराष्ट्राचा दर हा ३.५ टक्के असुन लातूर जिल्ह्याचा दर मात्र तब्बल ४.३ टक्के आहे.

लातूर जिल्ह्यात आजही १३८० व्यक्ती घरात विलगीकरणामध्ये आहेत तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये असणा-या नागरिकांची संख्या ही ८५१ आहे.जिल्हातील १४८५८ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यामध्ये १९९३ जण कोरोनाबाधित आढळुन आले तर २२०५ जणांची रॅपिड ॲन्टीजीन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ३१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात सध्या गंभीर अवस्थेतील १६ रुग्ण आहेत तर ऑक्सीजनवर मध्यम स्वरुपातील रुग्णांची संख्या ही २५ असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही ८८६ एवढी आहे.
close