केज | तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):-
सद्याच्या कोरोना या महाभयंकर रोगराईच्या संकटातही जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असनारे रमेश आडसकर . माजलगाव व केज तालुक्यातील ग्राउंड लेवल वरील कार्यक्रत्यांसाठी धडपड णारा माणूस. सत्ता नसतानाही अंबा कारखाना चालू करण्याचा धाडसी निर्णय रमेश आडसकर यांनी घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आनंदी झाला आहे. ऊसतोडीसाठी होणारी शेतकर्यांची परवड अंबा कारखाना चालू होणार असल्याने थांबणार आहे.
शेतकरी वर्गाला ऊसाचा योग्य भाव देण्याचा संकल्प रमेश आडसकर यांनी बोलून दाखवला आहे. रमेश आडसकर यांच्या मागे स्व. बाबूराव आडसकर यांची मोठी पुण्याई आहे.
रमेश आडसकर यांच्या वडीलांनी माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांनी केज च्या राजकारण ,सहकार ,शिक्षण इत्यादी क्षेञात 1965 ते 1990 पर्यंत केज , अंबाजोगाईच्या राजकारणावर मजबुत पकड निर्माण केलेली होती.कै.बापुसाहेब काळदाते विरुद्ध आडसकर ही लढत संपुर्ण देशात गाजली होती...! त्यातुनच " हाबाडा " या शब्दाची निर्मिती झाली ती आज तागायत राजकारणात चर्चिली जाते.
लोकसभेच्या प्रचार सभेत ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे यांनी ही या छोट्या हबाड्याला कमी समजु नका असे सांगितले होते याचाच परिपाक म्हणुन केज तालुक्यात 28000 ची लिड भाजपाला मिळवुन देण्यात मा.रमेशराव आडसकरांचा वाटा प्रमुख मानला जातो.ग्रामिण भागात आजही ग्रामपंचायत ,सेवा सहकारी सोसायटी ,केज कृषी उत्पन्न बाजार समिती ,अंबा सहकारी साखर कारखाना या सर्वांच्या माध्यमातुन ते खरे " मास लिडर " आहेत याची प्रचिती ते नेहमीच देत असतात.अंबा सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन अनेक भुमीपुञांना न्याय मिळाला.
आसरडोह व चनई सर्कल मधुन जि.प.सदस्य म्हणुन निवडुन आल्या नंतर त्यांचा राजकीय आलेख वाढतच राहिला.योगेश्वरी सुतगिरणी ते अंबासाखर चे चेअरमन हा प्रवास शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत असल्यामुळे ते नेहमीच शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटतात.पक्षीय मतभेद बाजुला ठेवुन राजकारण कसे करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे रमेशराव आडसकर आहेत.जि.प.चे उपाध्यक्ष असतांना ग्रामिण भागाशी त्यांची नाळ जुळली.यशवंत ग्राम समृद्धी योजनेतुन हजारो कामे केली.पहिल्यांदाच आलेल्या सर्व शिक्षा अभियानातुन बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जि.प.शाळांच्या नव्या इमारती निर्माण केल्या.वित्त आयोगाच्या माध्यमातुन अनेक रस्त्यांचे कामे पुर्ण केली. सर्व सामान्य माणुस हा केंद्रबिंदु माणुन काम केले.
राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेञातही त्यांचा वावर आहे.पाणी फाँऊडेशनच्या कामात त्यांनी आनंदगांव ,कळमअंबा ,दिपेवडगांव या ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान करुन आर्थिक मदतीचा हात ही दिला हे विशेष होय. केज ,अंबाजोगाई ,माजलगांव या तालुक्यात विविध समाजाच्या लग्नात त्यांची उपस्थिती हे त्यांच्या सामाजिक व वैचारिक वृत्ती दिसुन येते.कोणतेही काम मनापासुन करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.सध्याच्या कोव्हीड 19 कोरोनाच्या महाभंयकर महामारीत केज ,माजलगांव व अंबाजोगाईत प्रत्यक्ष जावुन गोर गरीब लोकांना अन्न धान्यांची मदत केली.माजलगांव मतदार संघातुन निसटत्या पराभव झाल्यानंतर ही दुसऱ्याच दिवशी अतिवृष्टीग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आडसकर धावले होते हे लोक कधीही विसरणार नाहीत.
शिक्षण क्षेञातही केज ,अंबाजोगाई धारुर व वडवणी तालुक्यात श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन शैक्षणिक वारसा जपण्याचे काम त्यांनी केले.प्राथमिक ते माध्यमिक शाळा सुरु करुन या भागात शैक्षणिक क्रांती केली.वसंत कनिष्ठ ,शिवाजी कनिष्ठ , व बाबुरावजी आडसकर वरिष्ठ महाविद्यालय केजच्या माध्यमातुन उच्च शिक्षण ही याच भागात मिळवुन दिले.
केजच्या शैक्षणिक क्षेञात शारदा इंग्लिश स्कुल , नर्सिंग स्कुल ,वसंत पाॉलिटेक्निक व आय टी.आय.व डी.फॉर्मसीचे शिक्षण संकुल निर्माण करुन ते आदर्श पद्धतीने चालविण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चनाताई आडसकर या ही मदत करतात.केज शहराच्या वैभवात या शैक्षणिक इमारती भर पाडत तर आहेतच परंतु शैक्षणिक आलेख ही उंचावत आहेत हे विशेष होय.जवळ जवळ दोन हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत.
साहित्यिक क्षेञातही त्यांनी केज करांसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन घेवुन नविन साहित्यिक व कवी ,लेखक यांना प्रोत्साहित केले.ग्राम विकास मंञी पंकजाताई ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये काम करत असतांना शेतकरी ,शेतमजुर ,व्यावसायिक ,साहित्यिक ,पञकार ,युवक या सर्वांना आडसकर आपले वाटतात यातच त्यांचे खरे श्रेय आहे.
घरातील कौटुंबिक आघात त्यांच्यावर झाले....त्यांचे वडील व सर्वांचे आधार वड तात्या ,बंधु प्रकाश आडसकर ,अॕड.मेघराज आडसकर यांच्या निधना नंतर एकटे पडलेले रमेशराव राजकारणात कधीच एकटे पडणार नाहीत याचीच चुणुक वेगवेगळ्या निवडणुका मध्ये दिसुन येते. पुतणे रुषीकेश भैया आडसकर व ते स्वतः तात्यांचा जनता दरबार त्याच नेटाने चालवतात हे विशेष होय. स्पष्टवक्तेपणा ,सचोटी,माणुस संग्राहक वृत्ती ,प्रामाणिकपणे कामाचा शेवट करणे ,धैर्य व निर्णय क्षमता व संयम या गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आहे.राजकारणात स्पष्टपणे हो किंवा नाही असे म्हणणारे हाताच्या बोटावर मोजता येईल असे आहेत.त्या पैकी रमेशराव आडसकर हे एक आहेत.
थोडक्यात काय...
"मै अकेला ही चला था जानिब -ए-मंजिल मगर ,
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..!"
प्रकाश मुंडे , केज

