केज | तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) :-
मानवी जीवाच्या मुळावर हे संकट आलेलं आहे. संकटात प्रत्येक माणूस घरात बसला आहे .
अशावेळी एकमेकांची चौकशी करणे , हृदय भावनेतून प्रेम लावणे ,याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. मणुष्य जन्म पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे सध्याचा काळ कुणाचा द्वेष करण्यासारखा, ना कोणाची निंदा करण्यासारखा, एकमेकांना समजून घ्या. गैरसमज असतील तर काढून टाका. पण खरच जिवाभावाने एकत्रित या. कोरोना ने सर्वांनाच चार भिंतीत कुलुप बंद केला आहे? त्यामुळे अहंपणा सोडा, आणि मानवतावादी दृष्टिकोनातून संकटाकडे बघा. घरबसल्या फुगून राहू नका संवाद एकमेकाला करत रहा? तोही केवळ मोबाईलवरच? आणि त्यातही जर तोंड लपवून बसलात? तर मग दुर्दैवाचे धनी तुम्हीच म्हणाव . चला तर मग जरा माणुसकी दाखवा , एकमेकाच्या हृदयाला भिडून जिवाभावाचा संवाद करा , यापेक्षा दुसरं काही नको? कारण भिंती आड सुद्धा एकमेकाकडे जायला परवानगी नाही? शेजार धर्म , व्यवहार बंद आहे . उघडा डोळे बघा नीट ,फक्त माणुसकी जपा ,संवाद करा आणि सुखाने जगा .एवढच आता आपल्या हाती आहे. आणि हे सर्व कराल तर मग संकटात तणाव मुक्त जगाल .
शब्दांकन
प्रकाश मुंडे तालुका
प्रतिनिधी, केज जिल्हा बीड

