shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तहसील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रकरणी शेकाप शिवसंग्राम रिपाईचे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात बोंब मारो आंदोलन..!!

केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤
बीड जिल्ह्यात नायब तहसीलदार मंडळ अधिकारी  कारकून यांच्या बदल्या झाल्या असताना केज तहसील अंतर्गत नायब तहसीलदारसह तलाठी मंडळ अधिकारी यांच्या बदल्या होनं अपेक्षित असताना जिल्हा अधिकारी साहेब यांनी कोनत्या मेहेरबानीने 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जैसे थे ठेवल्या आहेत .नेमकं कुठलं कारण आहे .स्थानिक लोक बाहेर जाण्यास तयार नाहीत.

भाई मोहन गुंड शेकाप.


भ्रष्टाचाराची पाळेमुळे याच ठिकाणी दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन देखील बदल्या होत नाहीत. वाळूचे पुरवठा विभागाचे अनेक तक्रारी दिलेल्या असताना आशा मुजोर आधिकार्याला पाठीशी घालत आहेत . वादग्रस्त असणारे राजकीय हितसंबंध जोपासणारे अधिकारी केज मध्ये नको आहेत. या मुळे सामान्य लोकांना त्रास होतो. अशा लोकांच्या तात्काळ बदल्या कराव्यात. या मागणीसाठी 24 ऑगस्ट रोजी केज तहसिलसमोर शेतकरी कामगार पक्ष, शिवसंग्राम,रिपाई, च्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र केज तहसीलदार यांना भाई मोहन गुंड, बाळासाहेब गलांडे, दिपक कांबळे यांनी दिले आहे .

  नायब तहसिलदार सचिन देशपांडे हे स्थानिक असून अनेक दिवसा पासून महत्त्वाच्या वेगवेगळ्या विभागावर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार काम केलेले आहे त्यांनी संबंधित विभागावर केलेल्या कामाच्या चौकशा झाल्यास अनेक भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे बाहेर निघतील प्रमुख्याने पुरवठा विभाग निवडणूक विभाग मध्यंतरी नगरपंचायत चा चार्ज घेऊन दर्जाहीन असलेले कामाचे बिल पास करणे असे चौकशी झाल्यास अनेक प्रकरणं बाहेर येतील. 

close