shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरूस्तीचे काम पुर्ण करा- पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे .!!

अलिबाग । राजेश बाष्टे :-
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी मुंबईहून कोकणातील आपल्या गावाकडे निघाले आहेत. या अनुषंगाने मुंबई-गोवा महामार्गावर, मुंबई गोवा वडखळ बायपास ते तरणखोप, कांदळेपाडा, रामवाडी-तरणखोप ब्रिज खाली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीचे काम गणेशोत्सवापूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मा.आ.पालकमंत्री कु अदितीताई  तटकरे यांनी दिले. 
याप्रसंगी प्रांताधिकारी मा.सौ. प्रतिमा पुदलवाड-शेंगुलवार, तहसिलदार मा.सौ.अरुणा जाधव, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित अधिकारी व ठेकेदार ,अभियंता, माजी सभापती नरेश मा.श्री. पाटील,मा.श्री.दयानंद भगत, मा.श्री.उदय जवके, मा.श्री.डी.बी.पाटील,मा.श्री.परशुराम मोकल,मा.सौ.चैताली पाटील आदी उपस्थित होते.
close