shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय औसा येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास मा.आमदार श्री.अभिमन्यु पवार यांची उपस्थिती..!!

लातूर । प्रतिनिधी (रवि बिजलवाड): दि.१५
लातूर : आज देश मोठ्या एकजूटीने कोरोनाच्या संकटाशी लढत आहे.या लढाईत आघाडीवर असलेले कोरोना योद्धे, स्वच्छता कर्मचारी,राशन दुकानदार,पोलिस कर्मचारी, जनजागृती करणारे मीडिया प्रतिनिधी व कोरोनावर मात करून बरे झालेले नागरिक यांचा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





यावेळी तहसीलदार सौ शोभा पुजारी,नायब तहसीलदार सौ वृषाली केसरकर,श्री कदम,श्री आळंदकर,बीडीओ श्री सुर्यकांत भुजबळ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शेख,डॉ अंगद जाधव,पोलिस निरीक्षक श्री ठाकूर,डॉ ढगे व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच, कोरोना मुक्त झालेल्यांना प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहनही यावेळी आमदार अभिमन्यु पवार यांनी केले.
close