shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पालकमंत्री अमितजी देशमुख यांना रुग्ण हक्क संघर्ष समितीचे निवेदन ...!!

लातूर । प्रतिनिधी( रवि बिजलवाड) 
दि. -१५/०८/२०२०.

लातूर शहर :- महाराष्ट्रातील सर्वच खाजगी रुग्णालये शासनाचा ताब्यात घेऊन माफक दरात करोना रुग्णांवर उपचार करा.देशाच्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य शासकिय ध्वजारोहन स्थळी मा. पालकमंत्री यांना सोशल डिस्टन्सिंगचा आदेशामुळे जिल्हाधिकारी द्वारा रुग्णहितार्थ महाराष्ट्रातील सर्वच खाजगी रुग्णालये शासनाच्या ताब्यात घेऊन अत्यंत माफक दरात करोना रुग्णांवर उपचार करावेत, खाजगी रुग्णालयासाठी शुल्क नियंत्रण कायदा करा,  भरारी पथकात रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रतिनिधी सहभागी करुन घेऊन भरारी पथकात पारदर्शकता आणा या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.


 करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन विविध खाजगी मंगलकार्यालये, वस्तीगृहे तसेच काहि महाविद्यालये ताब्यात घेण्यात येत आहेत.बरेच खाजगी रुग्णालयामधील बेड रिकामे असतानाही खाजगी  मंगलकार्यालये व इतर इमारती ताब्यात घेण्यामागचा हेतु काय? शासनाचा अनावश्यक अनाठायी खर्च करुन सुविधायुक्त खाजगी हॉस्पिटल्सना मोकळीक दिली जात आहे हे रुग्णहितार्थ नाहि..म्हणून  शासनाने महाराष्ट्रातील सर्वच खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे करोना रुग्णांवर अत्यंत माफक दरात उपचार करावेत, खाजगी रुग्णालयातील काळाबाजार रोखण्यासाठी शुल्क नियंत्रण कायदा करा. यासह विविध मागण्याचे निवेदन रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.अमितजी विलासरावजी देशमुख यांना देण्यात आले.

  रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या मागण्यांची दखल तात्काळ घेऊन अंमलबजावणी करावी अन्यथा रुग्णहितार्थ तिव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे ॲड. निलेश करमुडी,प्रशांत चव्हाण, संजयकुमार सुरवसे,समितीचे लातुर जिल्हाध्यक्ष  हनमंत गोत्राळ , विशाल होके, मिनाक्षीताई शेटे, सुनिल कसबे आदि उपस्थित होते.
close