गडचिरोली,ता.१४ : जिल्हयात आज १५ नवीन रुग्ण आढळून आले, तर २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या २६ जवानांमध्ये गॅरापत्ती येथील सीआरपीएफचे ११ जवान, हेडरी येथील ७ जवान, गडचिरोली येथील ४, अहेरी येथील ३ नागरिक तर धानोरा येथील एका पोलिसाचा समावेश आहे.
नव्याने कोरोनाबाधित आढळून आलेल्यांमध्ये कोरची तालुक्यातील गॅरापत्ती येथील ४ सीआरपीएफ जवान, सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील ५ व रंगधामपेठ येथील रुग्णांच्या संपर्कातील २, मुलचेरा येथील १ जण राजस्थानवरुन आला होता, भामरागड येथील रुग्णाच्या संपर्कातील विलगीकरणात ठेवलेले २ नागरिक आणि एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस मदत केंद्रातील एका सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८१६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ६५६ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत, तर सद्या १६० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

