shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पनवेल संघर्ष समितीच्या दणक्याने जेवणाची थाळी सुधारली..!कोविड रूग्णांना सकस अन्नाचा आता घेता येईल आस्वाद..!!

कांतीलाल कडू यांचे मानले आभार..!!

अलिबाग । प्रतिनिधी ( राजेश बाष्टे ):-
कोविड रूग्णांच्या जेवणाचा प्रश्‍न ऐेरणीवर आल्याने अनेकांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे महापालिका प्रशासनाचेे अनेकदा कडू यांनी कान पिळले होते. आता नव्याने दणका दिल्याने कोविड रूग्णांच्या जेवणात चांगलाच बदल झाल्याने रूग्णांनी पनवेल संघर्ष समिती आणि कांतीलाल कडू यांनी फोन करून ऋृण व्यक्त केले आहेत.

 कोविड रूग्णांना दिले जाणारे अन्न निकृष्ट आणि सुमार दर्जाचे असल्याचे पनवेल संघर्ष समितीने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना खरमरीत पत्राद्वारे कळविले होते. त्यानंतर प्रशासनाने जेवण पुरविणार्‍या ठेकेदाराला झटका देवून त्याच्याकडील काम काढून घेतले. नव्या ठेकेदाराने नव्याचे नऊ दिवस व्रत जपले. त्यानंतर त्यांनी पुन्हा ये रे माझ्या मागल्याचे नाटक सुरू ठेवल्याने काविड रूग्णांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी ताबडतोब ठेकेदाराच्या बिलाच्या रकमेवर आक्षेप घेताच ठेकेदार आणि प्रशासनाने धसका घेवून जेवणात सुधारणा घडवून आणली आहे. इंडिया बुल्स, उपजिल्हा रूग्णालय आणि इतर कर्मचारी, रूग्णांना देण्यात येणार्‍या थाळीत कमालीची सुधारणा केल्याने रूग्णांनी कडू यांचे आभार मानले आहेत.
close