shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हेल्थ लॅब कार्डचे अनावरण..!!

 

नेरुळ | प्रतिनिधी : महेश मस्कर
आज मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय काशीद आणि PRS लॅबच्या शुभांगी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 


लॉकडाऊन मुळे लोकांचे ज्या पद्धतीने आर्थिक गणित बिघडलंय, अशा कठीण काळात सामान्य लोकांना कोणत्याही स्वरूपाचे वैद्यकीय तपासण्यांचा खर्च देखील परवडनेसा झालाय. त्यामुळे या हेल्थ लॅब कार्ड लोकांना दिलासा नक्कीच मिळेल...  नागरिकांना आवाहन आहे, हेल्थ लॅब कार्ड साठी मनसे नेरुळ सेक्टर-२ येथील शाखेत संपर्क साधावा . तसेच कोरोना महामारीच्या काळात ज्या ज्या नोकरदार वर्गाने आपले कर्तव्य पार पाडले अशा  योध्याचा कोविड योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आजच्या कार्यक्रमात विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, विनोद पाखरे, मनसे शहर सहसचिव अभिजीत देसाई साहेब, वंदना घार्गे,शोभा नेटके,  शाखा अध्यक्ष अक्षय कदम, मंगेश चौघुले, निखिल नेटके, पुंडलिक पाटील, प्रियेश सावंत, उपशाखा अध्यक्ष विपुल पडवळ, प्रज्ञेश शिर्के, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नलावडे काका, आणी सर्व महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते.
close