सावळीविहीर (प्रतिनिधी) :
शिर्डी व परिसरात स्वतंत्र दिन साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरा झाला. शिर्डी नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष सौ.अर्चनाताई कोते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी नगरपंचायत चे नगरसेवक, नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे तसेच नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक, त्याचप्रमाणे शिर्डी शहरातील कोरोना योद्धे व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी कोरोना च्या संकटामुळे सोशल डिस्टंन्स पाळत हा स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच शिर्डी शहरातील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय, तसेच आदर्श विद्या मंदिर, विविध शाळा, हायस्कूल, महाविद्यालय व कार्यालयांमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण करून साध्या पद्धतीने या वर्षी साजरा करण्यात आला.तसेच शिर्डी येथे शिर्डी पोलीस विभागीय कार्यालय व शिर्डी पोलीस स्टेशन कार्यालया समोर भारताचा स्वातंत्र्यदिन शिर्डी पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.यावेळी प्रभारी पोलीस निरक्षक दीपक गंधाले,तसेच पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल ,हवालदार, पोलीस नाईक ,महिला पोलीस कर्मचारी ,उपस्थित होते. यावेळी डी वाय एस पी सोमनाथ वाकचौरे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना काळात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी राहता व कोपरगाव तालुक्यात मोठे परिश्रम घेत कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले .त्याबद्दल धन्यवाद मानले. या वर्षी भारताचा स्वातंत्र्यदिन शिर्डी पोलीस ठाण्यात साध्या पद्धतीने सोशल डिस्टंन्स पाळत, पण उत्साहात साजरा झाला.
राहाता तहसील कार्यालयातही स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, नायब तहसीलदार, बी डी ओ पंचायत समिती समर्थ शेवाळे, उप अभियंता, सभापती सौ.तांबे.उप सभापतीओमेश जपे. शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी व तहसील कार्यालयाचे संपूर्ण कर्मचारी, अधिकारी वर्ग ,उपस्थित होते.त्या प्रसंगी राहाता तालुक्यातील प्रथम कोरोणावर मात करून आलेले लोणी येथील कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला तसेच सफाई कर्मचारी,नर्स व 108 रुग्ण वाहिकेचे वाहक यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रमुख ग्रामस्थ व कर्मचारी सोशल डिस्टंन्स पळत उपस्थित होते. सावळीविहीर बु।।येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सौ.रुपाली संतोष आगलावे व श्री हनुमान क्लास कारवाडी शाळेमध्ये सावळीविहीर बु।। सोसायटीचे चेअरमन सुरेश भाऊसाहेब जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शिर्डी व परिसरातील गावात, विविध शाळांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनामुळे यावर्षी साध्या पद्धतीने पण उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

