shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषधी विक्रेत्यांनी ग्राहकांना देऊ नये...; विना प्रिस्क्रिप्शन औषधी दिल्यास कायदेशीर कारवाई:- जिल्हाधिकारी अभिजित राऊत..!!


प्रतिनिधी ।  प्रमोद चौधरी 
जळगाव :-जिल्ह्यातील सध्यस्थितीत कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याच बरोबर जिल्ह्यातील बरेचसे रुग्ण कोरोना संसर्गाच्या. अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याचे आढळून आल्याने कोरोना संसर्गात खोकला ,सर्दी,ताप, फ्लयु आदी लक्षणे आढळून येत आहेत अशा लक्षणाच्या आजारावरील औषधांची मागणी रुग्णांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय केली जाते .
अशा लक्षणाच्या आजारावरील औषधीच्या पुरवठा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय केल्यास रुग्ण हा मूळ आजाराच्या उपचारापासून वंचित राहू शकतो व त्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने सदर बाब विचारात घेऊन औषध विक्रेत्यांनी सर्दी ,खोकला, ताप ,फ्लयु ,सारख्या आजारावरील काही प्रकारच्या औषधीची विक्री कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर चिठ्ठीशिवाय करण्यात येऊ नये सदरील सूचनेचे काटेकोर पालन करण्यात यावे. सदर बाबीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे पत्रक आज जळगाव जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी काढले आहेत.
close