shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसंग्राम केज तालुका युवक आघाडी च्या अध्यक्ष पदी गणेश खांडेकर यांची नियुक्ती ....!!

शिवसंग्राम केज तालुका युवक आघाडी च्या अध्यक्ष पदी गणेश खांडेकर यांची नियुक्ती  ....!! 

केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे)  :-

केज तालुक्यातील गणेश खांडेकर यांची शिवसंग्राम भवन मध्यवर्ती कार्यालय बीड येथे  शिवसंग्राम युवक जिल्हा अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नियुक्ती करण्यात आली. 

या विषयी सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील तरुण तडफदार शेतकर्यांच्या विविध  प्रश्नावर सतत आक्रमक असणारे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे युवक गणेश खांडेकर यांची  शिवसंग्राम  युवक आघाडी केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती  करण्यात आली.  

या वेळी  निवडीचे पत्रक देताना *युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे* यावेळी  शिवसंग्राम बीड जिल्हा अध्यक्ष सुधीर (बापू) काकडे, जिल्हा सरचिटणीस अनिलजी घुमरे, सुहासजी पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव,तालुकाध्यक्ष लिंबराज वाघ, शिवाजी वाघमारे, शशिकांत दातार,प्रकाश रोमन,शिवाजी यादव,नितीन चांगण,अशोक वाघ पत्रकार बळीराम भोसले  यां सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
close