इंदापूर । प्रतिनिधी
तात्याराम पवार
लोणी देवकर ,दि.07/08/2020
लोणी देवकर एमआयडीसी मध्ये श्री हरिदास काटकर व श्री भागवत काटकर .श्री ज्ञानेश्वर काटकर वडापुरी यांनी शेती व्यवसाय करीत उद्योग व्यवसाय करण्याच्या संकल्पनेतून व जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर समाजात एक आदर्श शेतकरी पुत्र म्हणून आज उद्योगक्षेत्रात आपल्या कष्टाची चुणूक दाखवून काटकर कंट्रक्शन व फॅब्रिकेशन अशा उद्योग उभा केला . यामधून रेल्वेचे स्पेअर पार्ट तयार करण्याचा हा उद्योग असल्याने या उद्योगाला मोठी भरारी येणार आहे.या उद्योगाचे उद्घाटन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी त्यांनी काटकर परिवाराचा आदर्श शेतकरी कसा उद्योगपती होतो त्याबद्दल मत व्यक्त करून त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला शाबासकीची थाप देऊन या उद्योगाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सूत्रसंचालन महेंद्र काटकर यांनी केले त्यांनी हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे काटकर परिवारा वर सदैव प्रेम असल्याचे व्यक्त करून आभार मानले .यावेळी काटकर कुटुंबियांचे सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .या उद्योगामुळे इंदापूर तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे खरे कार्य या उद्योगा मार्फत केल्याबद्दल काटकर कुटुंबीयांचे तालुक्यांमध्ये विशेष कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.

