shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दार उघड उध्दवा,दार उघड...सेनगाव येथे भाजपाच्या घंटानाद आंदोलनास मोठा प्रतिसाद..!!

हिंगोली  प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२९,महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावी साठी झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आज दि.२९ आँगस्ट शनिवार रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले सेनगाव येथील नगरपंचायत येथून अप्पास्वामी मंदिर पर्यंत टाळ मृदुंच्या गजरात आप्पास्वामी मंदिर पर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज घंटानाद आंदोलन करण्यात आले.


सेनगांव शहराचे ग्रामदैवत आप्पास्वामी मंदीरा जवळ दार उघड उध्दवा दार उघड अशा विविध घोषणा देवुन राज्य सरकार च्या विरेधात  घंटानाद आंदोलन करण्यात आले याप्रंसंगी सेनगाव तालुका अध्यक्ष अशोकरावजी ठेंगल,किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख,माजी सभापती आप्पासाहेब देशमुख,तालुक्याचे संघटन सरचिटणीस श्रीरंग राठोड,  सेनगाव शहराध्यक्ष साहेबराव  तिडके,किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंडितराव तिडके,तालुक्याचे उपाध्यक्ष कैलास खाडे,गणेश जारे,नगरसेवक अजय विटकरे,ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब उफाड,माजी तालुका उपाध्यक्ष मारोतराव आन्ना काळबांडे,भाजपा नेते सुरेश खाडे भाजपा नेते विठ्ठल धाकतोडे,विलास तिडके आदी सर्व पदाधिकारी, आंदोलनामध्ये सहभागी होते .
close