इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार
श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिरा समोर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपचे नेते व माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून 'उद्धवा दार उघड ' अशी अशी जोरदार मागणी करण्यात आली. श्री लक्ष्मी- नरसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कुलदैवत आहे.
यावेळी बोलताना भाजप नेते मा. हर्षवर्धन पाटील यांनी राज्य शासनाला मंदिर उघडण्यास भाग पाडू, असा इशारा दिला. याप्रसंगी मंदिरासमोर विविध धार्मिक संघटनांनी भजनाचा कार्यक्रम केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, भाविक तसेच पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप अध्यक्ष शरद जामदार,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सचिव तानाजीराव थोरात, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राम आसबे, अमोल इंगळे, माऊली वाघमोडे,प्रा रामहरी लोखंडे व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

