shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका भाजपा अध्यक्षपदी ॲड. शरद जामदार...माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार..!!

 इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
दि.२८ इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी ॲड. शरद जामदार यांची निवड झाली आहे. भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा  इंदापूर येथे सत्कार केला.
   

यावेळी पुणे जिल्हा भाजपाचे सचिव तानाजी थोरात, इंदापूर भाजपा शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राम आसबे तसेच हर्षवर्धन कांबळे, सचिन सावंत उपस्थित होते.
      
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी व मजबुतीसाठी प्रयत्नशील राहू, असे सत्कार प्रसंगी शरद जामदार यांनी संगितले.
close