shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झाडाला बांधले फ्रेंडशिप बँड..निसर्ग हाच सच्चा अन निस्वार्थ मित्रवसुंधरा प्रतिष्ठान : निसर्गाशी मैत्री करण्याचे आवाहन..!!

झाडाला बांधले फ्रेंडशिप बँड
निसर्ग हाच सच्चा अन निस्वार्थ मित्र..
वसुंधरा प्रतिष्ठान : निसर्गाशी मैत्री करण्याचे आवाहन..!!


लातूर जिल्हा। प्रतिनिधी :
( रवि बिजलवाड)

ऑगसट ०३ । लातूर शहर :

  लातूर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन फ्रेंडशिप डे अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. झाडाला फ्रेंडशिप बँड बांधून निसर्गाशी मानवाने नाते आणखी घट्ट करावे आणि पर्यावरण संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील मोती नगर वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

मागील काही वर्षात मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते दुरावत चालले आहे. मानवाकडून बेसुमार वृक्ष तोड केली जात असून त्याचे विपरीत परिणाम समोर येत आहेत. मानव आणि निसर्ग यांच्यातील घट्ट होण्यासाठी मानवाने निसर्गाशी मैत्री करावी असे आवाहन करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने झाडांना मैत्रीचा धागा बांधून 'झाडे लावू, झाडे जगवू' हा संदेश दिला. निस्वार्थ भावनेने झाड मानवाला ऑक्सिजन देत असतो. मानवानेही निसर्गाचे संरक्षण करणे गरजेचे असून मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते दृढ होणे आवश्यक आहे. 

या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे लातूर शहर संघटक प्रशांत स्वामी, सदस्य अनिल जाधव, नागेश धुमाळ, गणेश कांबळे, नितीन सूर्यवंशी, दत्ता जाधव आदींनी सहभाग घेतला.

मैत्री दिवशी वृक्षारोपण....
मोती नगर भागात फ्रेंडशिप डे निमित्ताने वसुंधरा प्रतिष्ठान, श्री.शिवछत्रपती गणेश मंडळ आणि श्री. तुळजाभवानी नवरात्र महोत्सव यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ज्या ठिकाणी नागरिक कचरा टाकतात त्या ठिकाणी झाड लावून परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर उपक्रम मोती नगर भागातील श्री. रुद्र हनुमान मंदिर परिसरात राबविण्यात आला.
close