shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रांताधिकारी गोविंद शिंदे व राहाता तालुका तहसीलदार यांना आदर्श पुरस्कार..!!



सावळीविहीर( प्रतिनिधी) :

राहता तालुक्यात कोरोनाचे मोठे यशस्वी काम करणारे व  कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारे, महसूल क्षेत्रातही मोठे यशस्वी काम करणारे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना आदर्श प्रांताधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.तसेच महसुली कामकाज जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचे केल्यामुळे व  शासकीय वसुली जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यात सर्वात अधिक 125 टक्के झाली असून पुरवठा कामकाजामध्ये राहता तालुका अव्वल राहिला आहे.
                     प्राताधिकारी गोविंद शिंदे 

 राहता तालुक्यात सातबारा संगणीकरण सर्वत्र झाले असून राहता तालुक्यातील विविध योजनांचे लाभार्थींना वेळेवर अनुदान देण्यात आले आहे. व ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे. राहता तालुक्यात व शिर्डी उप विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या राहाता व। कोपरगाव तालुक्यातही नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व कामकाज यामध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व राहत्या चे तहसीलदार कुंदन हिरे यांना हा आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे. राज्यात, अहमदनगर जिल्ह्यात, उत्कृष्ट कामकाज केल्यामुळेच हा पुरस्कार मिळालेला आहे.
राहता तालुक्याचे मनमिळावू ,शिस्तबद्ध व अहोरात्र कोरोणाच्या काळात काम करणारे प्रामाणिक असे तहसीलदार कुंदन हिरे यांना आदर्श तहसीलदार म्हणून पुरस्कार घोषित झाला आहे. त्यामुळे सर्व राहता तालुक्यातून प्रांताधिकारी गोविंद शिंदे व राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांचे अभिनंदन होत आहे.
                 तहसीलदार कुंदन  हिरे 
 राहता तालुक्यात कोरोना काळात  दोन्ही अधिकाऱ्यांनी अहोरात्र, जीव धोक्यात घालून मोठे प्रयत्न केले व करत आहेत. त्यामुळे राहता तालुक्यात कोरोणा बाधीतांची  संख्या कमी आहे ,त्याच प्रमाणे राहता तालुक्यात महसूल विभागात मोठे यशस्वी काम झाले आहे. या सर्वांची दखल घेऊन प्रांताधिकारी गोविंद शिंदे  व राहता तालुक्याचे मनमिळावू तहसीलदार कुंदन हिरे यांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे राहता तालुक्यातील सर्व नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे. चांगल्या, व प्रामाणिक अधिकाऱ्यांनाया पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल शासनाचेही अभिनंदन होत आहे. राहता तालुक्यातील तहसीलदार कुंदन हिरे यांनी सर्व शासकीय यंत्रणेला शिस्तबद्ध करण्याचे काम केले आहे ,त्यामुळे राहता तालुक्यात मोठी शिस्त लागली आहे. 

राहता तालुक्यातील  शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरेसाहेंब कोरोना काळात अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळेच शिर्डी राहता व तालुक्यात कोरोणाला मोठा आळा बसला आहे, त्याचप्रमाणे  कोरोणा बाधित व्यक्तींना  शिर्डीच्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये किंवा लोणीच्या केअर सेंटर मध्ये  मोठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.तसेच  कोरोणा बाधित यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात  ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्याकडेही  ही आरोग्य तपासणी,योग्य आहार ,योग व्यायाम याकडेही त्यांचे मोठे लक्ष त्यांचे होते. शिर्डीच्या  कोव्हीड केअर सेंटर मध्ये  भजन संध्या चा कार्यक्रम घेऊन  त्यांनी  राज्यातही इतर कोअर सेंटरमध्ये एक आदर्श निर्माण केला होता.  

त्याच प्रमाणे  त्यांनी  शिर्डी व परिसरात  कोरोनासाठी  विविध  निर्णय घेऊन  आळा बसण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते व करत आहेत.हे करत असताना ते स्वतःहून  कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत, त्यामुळे ते राहता तालुक्यातील नागरिकांना  आपले अधिकारी म्हणून वाटतात, प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांचे उत्कृष्ट काम बघूनच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांनी  या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोठे कौतुक केले होते. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या  प्रामाणिक व उत्कृष्ट  कामामुळेच  प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांना आदर्श म्हणून पुरस्कार रक्षाबंधन या  सणाच्या दिवशी मिळालेला आहे ,त्याबद्दल त्यांचे सर्व थरातून मोठे अभिनंदन होत आहे.
close