shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ताई तुझ्या रक्षणासाठी हा भाऊ सदैव तत्पर असेल..!!आमदार रोहित पवारांनी 'दादा' बनून जपले बहीण-भावाचे नाते..!!

ताई तुझ्या रक्षणासाठी हा भाऊ सदैव तत्पर असेल..!!


खर्डा । वार्ताहर :
(अनिल धोञे)
रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनाला एका वेगळ्याच उंचीवर नेत  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी 'दादा' बनून बहीण भावाचे अतुट नाते जपले आहे.आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात पार पडलेल्या रक्षाबंधनाच्या उपक्रमात  जामखेड तालुक्यातील खर्डा आरोग्य उपकेंद्रावर रक्षाबंधन पार पडले.यात रोहित पवारांच्या विचाराच्या नेते कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा असलेल्या महिला डॉक्टर,आरोग्यसेविका,आशा सेविका सर्व कर्मचारी भगीनींच्या हातून राखी बांधून घेत 'ताई तुझ्या रक्षणासाठी हा भाऊ सदैव तत्पर असेल' अशी शपथ दिली.

कोरोना महामारीच्या संकटात आपल्या कुटुंबाचा विचार न करता प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून राज्यभरातील महिला डॉक्टर,आरोग्यसेविका,आशासेविका सर्व महिला कर्मचारी भगिनी प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत प्रत्येक नात्याला भक्कम करत आहेत. हे त्यांचे कार्य अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. त्यांच्या अविरत सेवेचे आभार मानावे तितके कमीच आहेत.मात्र त्यांचे धैर्य,मनोबल वाढावे म्हणुन हा उपक्रम राबवण्यात आला.विशेष म्हणजे बहिणीच्या ओवाळणीची भेट म्हणुन प्रत्येक भावाकडून सॅनीटायझर देण्यात आले.

दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक योद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.त्यांचे हे ऋण अवघा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.कर्जत-जामखेडची कोरोना बाबतची परिस्थिती हाताळताना आ. रोहित पवारांनी सुरुवातीपासुनच विशेष काळजी घेतली आहे. रक्षाबंधन हे निमित्त असले तरी प्रत्येक कोरोना योद्धयाची काळजी घेणारे आ.रोहित पवार केंव्हाच भाऊ बनले आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, खर्डा शहरअध्यक्ष संतोष लष्करे, तुळशीदास गोपालघरे,ज्ञानेश्वर थोरात ,कपिल लोंढे, ज्ञानदेव इंगोले व डॉक्टर ,आरोग्यसेविका,आशा सेविका सर्व  कर्मचारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
close