संगमनेर :
संगमनेरतालुक्यातील गोडसेवाडी शिवारातील एका तरुणाला उसनवारी पैशाच्या कारणावरून त्याला गळा आवळून ठार करण्यात आले. तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला निळवंडे येथे कॅनॉल च्या खड्यात टाकून दिले. हा प्रकार संगमनेर पोलिसांन्नी उघड केला. साकूर जवळील शिंदोडी; तालुका संगमनेर येथील रामदास कारभारी येरमल वय ३३ याची यामध्ये हत्या झाली. या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या कुटुंबीयांनी ३ जणांवर आरोप लावला आहे.
यामध्ये त्याला पहिल्यांदा गळफास देऊन मारून टाकले व याचा मृतदेह निमज गावच्या एका बोगद्याजवळ हा मृतदेह ८ ऑगस्ट ला सापडला होता. यानंतर पोलिसांनी धाव घेत सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. तर त्याचा पंचनामा करून बाॅडीचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर हा तरुण कोण असावा हा तप्पास सुरू झाला. मात्र तरुणाचा मृतदेह व चेहरा पूर्ण काळा पडल्यानंतर त्याची ओळख पटणे अवघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा फोटो सोशल मिडिया वर शेअर केला. हा तरुण त्याच परिसरातील अवघ्या २ ते ३ किमी अंतरावरील होता. पोलिसांना त्याची ओळख पटली असता त्याच्या संपर्कातील मित्र नातेवाईक यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपी आणि मयत यांच्यात किरकोळ वाद झाले. पैसे देवाणघेवाणी वरून त्यांचे कायम वाद होत असल्यामुळे या तिघांनी येरमल याला मारून टाकले व त्याने आत्महत्या केली असा बनाव दाखवला. याचा पोलीसांना सुगावा लागल्यानंतर तिघांना अटक करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस उपाधीक्षक रोशन पंडीत, पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो नि.पप्पु कादरी हे करीत आहेत.