shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्व वारकरी सेनेच्या इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी ह.भ.प. श्री दशरथदादा भोंग यांची निवड ..!!


इंदापूर । प्रतिनिधी
 तात्याराम पवार
इंदापूर येथील ह.भ.प. श्री दशरथ दादा भोंग महाराज युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर चे मार्गदर्शक यांची निवड विश्व वारकरी सेना इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड दि.५/८/२०२० रोजी करण्यात आली.भोंग महाराज हे स्वदेशीचा महामंत्र देणारे असून अध्यात्मिक क्षेत्रात एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे व परमार्थ मय जीवन जगणारे तसेच राम कृष्ण हरी या नामजपाचे सतत उच्चार करणारे; द्वेष,अहंकार, मोह इत्यादी पासून मुक्त असणारी सत्वगुणी व्यक्ती आहेत. क्रांती युवा प्रतिष्ठान चे प्रशांत दादा सिताप यांनी दशरथ दादा भोंग यांची स्तुती व कौतुकाचा वर्षाव करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रशांत दादा यांची  त्यांच्याविषयी मनोधारणा अशी आहे की,राम कृष्ण हरी हे गोड शब्द काणी पडताच समजते की हा भोंग दादाचा फोन आहे हे त्यांचे घरचे ही सहज ओळखतात..दररोज पांडूरंग व माता रूक्मिणीच्या दैनंदिन पुजेचे फोटो नियमित पाठवणारे..ज्यांचा शांत सात्वीक चेहरा पाहीला की डोक्यातील राग, लोभ, मद, मत्सर सर्व डोक्यातून नाहीसे होते..डोकं तात्काळ शांत होते...

अशा संत सज्जन व्यक्तीला इंदापूर तालूका ऊपाध्यक्ष पदी निवड करून सत्कार्य करायची संधी दिल्याबद्दल विश्व वारकरी संघटनेच्या सर्व कार्यकारणीचे मनपुर्वक आभार त्यांनी मानले. "भोंग दादा तूम आगे बढो; युवा क्रांती तूम्हारे साथ है." असे व्यक्त करून त्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले.

तसेच युवा क्रांती प्रतिष्ठाण व इंदापूर सायकल क्लबचे सर्व सभासद यांच्यावतीने दादांचे अभिनंदन करण्यात आले.
close