shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खाकी वर्दीतील खरा कोरोना योद्धास त्यांच्या जन्मदिवशी शिर्डी एक्सप्रेस चा मानाचा मुजरा..!!

एरंडोल। प्रतिनिधी(प्रमोद चौधरी)➤
दि.२६,एरंडोल नगरीचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक, शांत,मनमिळावू, आदरणीय श्री स्वप्नील जी उनवणे साहेब यांचा आज दि.२६ आँगस्ट बुधवार रोजी जन्मदिवस..



लॉकडाऊन च्या काळात संपूर्ण  पोलिस दलाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन लॉकडाऊन च्या काळात नियम नागरीकांनी पाळावे, यासाठी अहोरात्र स्वप्निल उनवणे साहेब  व  त्यांचे सहकारी   झटत होते देशांत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असताना देखील काही नागरीक सर्रास नियम तोडत होते यामुळे लॉकडाऊनचा नियम धाब्यावर बसविणा-यांवर कारवाई करण्याची वेळ त्यांच्यावर आली डोळ्यात तेल घालुन अहोरात्र त्यांनी कर्तव्य बजवले. ज्यांनी एरंडोल नव्हे तर एरंडोल तालुक्यात आपली माणुसकी ची एक अशी छाप निर्माण केली , धर्मिक व सामाजिक बांधिलकी जपून काही निर्णय त्यांनी घेतले लॉक डाऊन च्या काळात अनेक धार्मिक  उत्सव आले  त्यांनी  सर्वधर्मीयांना आपल्या भूमिकेतून त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या या भूमिकेला सर्व स्तरातून प्रचंडच असा प्रतिसाद त्यांना मिळाला या महिन्यात झालेल्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिवसाच्या निमित्ताने एरंडोल शहरात ना भूतो ना भविष्य असे भव्य  महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती.

 त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करीत 154 रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री गणेशोत्सव महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यामुळे श्री स्वप्निल उनवणे साहेब यांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना बहुतेक ग्रामीण भागात प्रस्तावित केली यांच्या प्रास्ताविक केला उदंड असा प्रतिसाद मिळाला या वर्षाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा या हेतूने त्यांनी आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करणे सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरणा मलेरिया डेंग्यू इत्यादी आजार बाबत दंडात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी .श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर वेब-साईट वर फेसबुक द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी .गणपती मंडळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ घेऊ इच्छिणाऱ्या भाविकासाठी शारीरिक अंतराचे फिजिकल डिस्टिन तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

 अशा प्रकारच्या विविध कार्यामध्ये श्री स्वप्निल उनवणे साहेब यांचे व्यक्तिमत्व दिसून येते अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यास जन्मदिवसाच्या दिवशी शिर्डी एक्सप्रेस चा मानाचा मुजरा..!
close