shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी२५ हजार नुकसान भरपाई द्या-मराठा शिवसैनिक सेनेची मागणी..!!

हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन,मुग,तुर,उडीद आदी पिके जमिनीतच सडुन गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज दि.२६ आँगस्ट बुधवार रोजी सेनगांव तहसिलला मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. 


मागील १५ दिवसापासून हिंगोली जिल्ह्यासह सेनगांव तालुक्यात संततधार पाऊस पडत असल्यामुळे हातात आलेले मुग,उडीद,तुर,सोयाबीन आदीसह पिके जमिनीतच सडुन गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला असून कृषीविभागाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई म्हणून शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये मंजूर करण्यात यावे या मागणीचे निवेदन मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने तहसिल कार्यालयास देण्यात आले आहे.या निवेदनावर मराठा शिवसैनिक सेनेचे शेतकरी जिल्हाप्रमुख गजानन देशमुख,सेनगांव तालुकाप्रमुख बालाजी भिसे,तालुका सरचिटणीस अंकुश देशमुख,उपाध्यक्ष विशाल गवळी,महादेव हारण,शेख मुराद आदीच्या स्वाक्ष-या आहेत.
close