shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी रद्द करा ; गरिबी निर्मूलन समितीची मागणी..!!

पिंपरी:-पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत, बो-हाडे वस्ती या ठिकाणी घरांचे काम चालू आहे. यासाठी महानगरपालिका मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी गरिबी निर्मूलन समितीने केली आहे.


याबाबत समितीच्या वतीने निवेदन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दृष्ट्या गरिब कुटुंबाचे गरिबीचे निर्मूलन व्हावे. त्यांना स्वःताचे घर मिळावे म्हणून च-होली , रावेत, बो-हाडे वस्ती या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांचे काम चालू आहे.

त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये पाच हजार रूपये भरावे लागणार आहेत. तसेच, इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीमुळे शहरातील बरेच कुटुंब घरात बसून होते. या सर्वांचे हातावर पोट असल्याने यांच्याकडे पाच हजार रूपये भरण्याची आता ऐपत नाही.

त्याबदल्यात त्यांच्याकडून पाचशे रूपये घ्यावेत. अनेक कुटुंबाकडे जातीचे प्रमाणपत्र नाही. पॅनकार्ड नाही तसेच रेशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळू शकत नाही. या अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
close