shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अर्जुन पुरस्कार चे मानकरी सुयश जाधव यांचा इंदापूर येथे सत्कार..!!

इंदापूर  प्रतिनिधी (तात्याराम पवार):
इंदापूर येथे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र व अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरण क्षेत्रात  राष्ट्रीय खेळाडू असणारे सुयश जाधव यांचा सत्कार इंदापूर येथे माझी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब व व जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील तसेच श्री महेंद्र रेडके श्री अमोल इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुयश जाधव यांचे वडिलांनी वयाच्यास दुसऱ्या वर्षीपासूनच त्यांना पोहायला शिकवले आणि पाण्याशी लहानपणीच त्यांची गट्टी जमली. सतत पोहण्याचा सराव करत  ते निष्णात जलतरणपटू बनले,

मात्र बाराव्या वर्षी एका विवाह समारंभात विजेचा धक्का बसला आणि त्यात गंभीर जखमी अवस्थेत सहा महिने दवाखान्यात काढावे लागले. दोन्ही हात निकामी झाल्याने ते कापावे लागले आणि वडिलांनी पाहिलेले राष्ट्रीय जलतरणपटूचे स्वप्न भंगले. 
 
मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे व आपण या स्थितीतून बाहेर यायचे म्हणत त्यांनी जिद्द न सोडता दोन्ही हात नसतानाही अभ्यास व पोहण्याचा सराव सुरू ठेवला.

दहावी व बारावीच्या परीक्षेत अपंगांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले. फक्त शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर अनेक अडचणींवर मात करीत पोहण्यातही तरबेज झाले. अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करत पोहण्याच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १११ पदके मिळवली.

रशियात खेळण्याची संधी मिळाली,तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू बनू शकलो नाही, मात्र मुलाला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवायचे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या वडिलांनी जमीन विकली. तरीही पैसे कमी पडल्यानंतर काही मान्यवर  यांनी आर्थिक मदत केली आणि सुयश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकले.

आई-वडील, शिक्षकांनी त्यांना सामान्य मुलासारखीच वागणूक दिल्याने इथपर्यंत पोचल्याच ते अभिमानाने सांगतात,म्हणूनच दिव्यांगांकडे अपंग म्हणून पाहू नका, त्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्याशी स्पर्धा करा, त्यांना प्रोत्साहन द्या, नक्कीच ते त्यांच्यात असणाऱ्या असामान्य गुणांच्या जोरावर देशाचं नाव उज्वल करतील.

मोठ्या अभिमानाने सांगावस वाटत शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुयश जाधव यांना आज भारत सरकार तर्फे  देण्यात येणारा मानाचा "अर्जुन पुरस्कार" जाहीर झाला आहे
 
त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले यावेळी येथे इतर मान्यवर ही उपस्थित होते
close