इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर स्वच्छ सर्वेक्षण 2020 व बेस्ट सेल्फ सस्टेनेबल सिटी अवार्ड पुरस्काराचे खरे मानकरी इंदापूर नगरीतील नागरिक नगरपालिका प्रशासन आणि जे प्रत्यक्ष परिसरातील काम करणारे आरोग्य दूत सफाई कर्मचारी यांचा वाटा निश्चितच सिंहाचा आहे.
सफाई कर्मचारी हे काम इतक्या आतमीयतेने करताना दिसतात. खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांनी भारता प्रती पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे असे मानून इंदापूर नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आपले कर्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. एवढ्या आत्मीयतेने काम पाहताना त्यांच्यासोबत उभा राहून त्यांच्यातीलच एक सदस्य असल्याचे वारंवार सोबत असणाऱ्या माननीय नगराध्यक्षा सौ अंकिता ताई मुकुंद शहा व सहकारी नगरसेवक आपणाला दिसत होते.
सफाई कर्मचारी यांची आरोग्य आणि इतर समस्या सोडवण्या करीता प्रयत्न केले सर्व कर्मचारी यांच्यासोबत असणाऱ्या भावनिक आणि कर्तव्य परायण असणाऱ्या अंकिताताई त्यांच्या कायम सोबत हसतमुख होऊन बरोबरीने काम करीत असताना शहरातील नागरिक ज्यावेळी पाहतो त्यावेळी आपलेही कर्तव्य लक्षात ठेवून पक्या इराद्याने या सफाई अभियानामध्ये हिरारीने भाग घेत असतो आणि म्हणूनच हा मिळालेला सन्मान खऱ्या अर्थाने सार्थकी ठरतो आणि शाब्बासकीची थाप सर्वांना मिळते देशात 14 वा क्रमांक आणि सलग तिसऱ्यांदा देशपातळीवर मिळालेला सन्मान हा प्रत्यक्ष कार्यस्थळावर कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी बंधूंचा म्हणावा लागेल सौ अंकिता ताई शहा नगराध्यक्ष झाल्यापासून माणसांमधील असणारी उपजत असणारी कार्यकुशलता योग्य दिशेने वापरण्याचे कस नगराध्यक्षांना असल्याचे मागील काळामध्ये जाणवले कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रशासकीय कौशल्य वापरून त्यांच्यासोबतच सर्व नगरसेवक सहकारी व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनातून प्रयत्न कामी आले.
कर्मचारी कौटुंबिक सामाजिक आर्थिक परिस्थितीने स्थिर-स्थावर होत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढवून देऊन त्यांना स्वाभिमान जागृत केला आणि इथेच खरी किमया घडली हेच कर्मचारी ज्या वेळी नगराध्यक्षा स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावर येऊन काम करतात तेव्हा या सर्वाची कर्तव्य तत्परता आणि बांधिलकीच्या स्वरूपात क्षमतेने कामाची सुरुवात होते आणि त्याचा परिणाम या आणि अशा पुरस्कारांच्या माध्यमातून समाज मनावर झालेला दिसतो. सफाई कर्मचारी आणि इतर सर्व या स्वच्छता अभियानात ज्यावेळेस पूर्ण क्षमतेने झोकून देतात तेथेच तर अशी उंच भरारी घेता येते ती नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी आणि पदाधिकारी यांनी करून दाखवले आहे असे म्हणता येईल सर्वेक्षण २०२० स्वच्छ हॉटेल्स, शाळा, रूग्णालय, सोसायटी (RWA/मोहल्ला) व स्वच्छ मार्केट एसोसिएशन तिमाही स्पर्धा व हरित घर स्पर्धा या जाहीर प्रकटनाद्वारे happyइंदापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व हॉटेल्स, शाळा, रूग्णालय व मार्केट यातील नागरिकांना कळविणेत येऊन गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२०' राबविण्यात आले. त्या अनुषंगाने इंदापूर शहरातील सर्व समाजातील घटकांमध्ये नियमित व सतत स्वच्छता राखली याकरिता इंदापूर नगरपरिषदे मार्फत 'स्वच्छ हॉटेल्स,शाळा, रूग्णालय, सोसायटी (RWA/मोहल्ला) व स्वच्छ मार्केट एसोसिएशन तिमाही स्पर्धा व हरित घर स्पर्धा' विनामूल्य आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील सर्व हॉटेल्स, शाळा,रूग्णालय, सोसायटी (RWA/मोहल्ला) व मार्केट असोसिएशन व तसेच घरांतील नागरिक यांनी सहभाग नोंदवाला, तसेच विजेत्यांना इंदापूर नगरपरिषदेमार्फत सन्मानपत्र देण्यात आले आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गतच्या शहर स्वच्छता अंमलबजावणी कक्ष (PIU) उभारून स्पर्धेत इंदापूर शहरातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्यास इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य केले.
इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ७ वा क्रमांक आणि भारताच्या पश्चिम_विभागात ७ वा क्रमांक आणि संपूर्ण भारत देशात १४ क्रमांक प्राप्त केला आहे. व तसेच बेस्ट सेल्फ सस्टेनेबल सिटी अवॉर्ड प्राप्त झालेला आहे .तरी इंदापूर नगरपरिषदेमार्फत इंदापुरातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले तसेच नगरपरिषदेस इंदापूर करांनी केलेल्या सहकार्याबद्द्ल सर्वांचे मनापासुन आभार व धन्यवाद मानण्यात आले.
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष , नगरसेवक, सर्व मुख्य अधिकारी, अधिकारी,पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे हार्दिक अभिनंदन संपूर्ण जनतेतून केले जात आहे

