shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापाव पडला अडीच लाखांना..!!

पिंपरी :- जागतिक वडापाव दिनी पिंपरीतील हातगाडीवरून वडापाव घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. वडापाव पार्सल घेऊन निघालेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता तपोवन मंदिर रोडवरील गणेश मंदिराच्या शेजारी ही घटना घडली.


कमल मदन गोयल (वय ५३, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल गोयल तपोवन मंदिर रोडवर गणेश मंदिराच्या शेजारी असेलल्या वडापावच्या गाडीवरून वडापाव पार्सल घेऊन जात होत्या. वडापाव त्यांच्या दुचाकीच्या डीक्कीमध्ये ठेवत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कमल यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने हिसकावून नेले. या घटनेचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
close