हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि. ०१,हिंगोली जिल्हयात ठिकठिकाणी भाजपाचे दुध दर वाढीसाठी आदोंलन झाले यामध्ये सेनगांवमध्ये भाजपाच्या वतीने गणरायाच्या मुर्तीला दुधाचा अभिषेक करुन दुध दर वाढीसाठी शासनाचा निषेध करण्यात आला आहे.
कृ.ऊ.बा.समितीच्या प्रवेशव्दाराजवळ देखील दुध सांडून शासनाच्या विरोधात घोषण देत निषेध करण्यात आला. सेनगांव तहसिलला निवेदन देत त्यामध्ये नमुद करण्यात आले आहे की,भाजपाच्या वतीने शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शासन दरबारी वारंवारं मांडल्या परंतु हे शासन शेतकरी विरोधी असुन शेतक-यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेप्रमाणे आज दि.०१ आँगष्ट शनिवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात दुग्धाभिषेक करुन तसेच मोफत दुध वाटुन शासनाला दुध भेट देऊन महायुतीच्या वतीने निषेध केला आहे. आमच्या प्रमुख मागण्या दूधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधभुक्टीला प्रतिलिटर ५० रुपये अनुदान व अतिरिक्त दुध शासनाने किमान ३० रुपये प्रतिलिटर भावाने खरेदी करावे. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख, जेष्ठ नेते आप्पासाहेब देशमुख, भाजपा किसान मोर्चा सेनगांव तालुकाध्यक्ष पंडीत अण्णा तिडके,विठ्ठल धाकतोडे,श्रीराम देशमुख,नगरसेवक संतोष खाडे,अजय विटकरे,डाँ.साहेबराव तिडके, गोपाल गट्टाणी,सोंडु पाटील,महादेव धोतरे, शंकरराव देशमुख आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

