फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची लक्षणे, कारण आणि त्याला कसे रोखता येईल, याविषयी माहिती पाहुयात...
धुम्रपान केल्याने या आजाराचा धोका अधिक आहे. मात्र ज्यांनी आयुष्यात कधीच ध्रुम्रपान केलेले नाही, अशांना देखील तो होऊ शकतो. विशेष म्हणजे याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाहीत. आजार अॅडव्हान्स स्टेजवर पोहचल्यावर याची माहिती मिळते.
💁♂️लक्षणे काय? : वारंवार खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, घसा बसणे, छातीत कफ होणे, वजन कमी होणे, हाडे दुखणे आणि डोके दुखी.
🧐 प्रमुख कारण :
● धुम्रपान हेच प्रामुख्याने या आजाराचे कारण आहे. मात्र या व्यतिरिक्त या आजाराचे आणखीही काही कारणे आहेत.
● जर तुम्ही अन्य प्रकारच्या कॅन्सरसाठी रेडिएशन थेरेपी केली असल्यास, या आजाराचा धोका उद्भवतो.
● रेडॉन गॅसच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होता.
● अर्सेनिक, क्रोमियम आणि निकेल सारख्या एलिमेंटच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होतो.
● दरम्यान तुम्ही कोठे राहता? काय काम करता? हे देखील खूप महत्त्वाचे ठरते.
● धुम्रपान करणारे किंवा या धुराच्या संपर्कात येणाऱ्यांनाही हा आजार होऊ शकतो. मात्र या प्रकारात कॅन्सरचे कारण शोधता येत नाही.
❓ फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रकार किती?
: याला दोन भागात विभागण्यात आले आहे. 'स्मॉल सेल लंग कॅन्सर' आणि 'नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर'.
👍 असा करा स्वतःचा बचाव:
● सर्वात महत्वाचे म्हणजे धुम्रपान करू नका.
● धुम्रपान करणाऱ्याच्या संपर्कात येणे टाळा.
● हार्ड रेडॉन भागांपासून लांब रहा.
● कामाच्या ठिकाणी कार्सिनोजेंस सारख्या विषारी केमिकलपासून लांब रहा.
● आहारात फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
● नियमित व्यायाम करून, तुम्ही हा आजार टाळू शकता.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.

