shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना काळात लोकप्रतिनिधी मैदानात असला पाहिजे... जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे एरंडोल येथे कोविड रुग्णालय उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन..!!

लोकप्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्षाचा असो त्याने कोरोना काळामध्ये मैदानात असले पाहिजे नागरिकांना लोकप्रतिनिधीचे मानसिक समर्थन फार महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी येथे सायंकाळी एका कार्यक्रमात बोलताना केले.


२२ ऑगस्ट २० शनिवारी   सायंकाळी एरंडोल येथे धरणगाव रस्त्यालगतच्या कमला लॉन्स याठिकाणी अष्टविनायक कोविंड सेंटरचे उद्घाटन मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भैय्या सो रमेश  परदेशी हे होते.
                 
एरंडोल येथे डॉ. हर्षल माने, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. महेश पाटील त्यांनी पुढाकार घेऊन कोरोना काळात रुग्णांसाठी सुविधा  उपलब्ध करून दिली आहे.
उद्घाटन प्रसंगी अमित पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील, कमल लॉन्स चे मालक समाधान पाटील, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, जि.प.सदस्य नाना भाऊ महाजन, डॉ. माने, डॉक्टर स्नेहल पाटील, डॉ. राहूल पाटील, डॉ. महेश पाटील, डॉ. ईशांत जैन, योगेश महाजन, डॉक्टर संदीप जोशी, प्रशांत शिंदे, डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर नितीन पाटील, गजानन महाजन, डॉक्टर राहुल वाघ, डॉक्टर फरास बोहरी,  महानंदा ताई पाटील, अशोक पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
   
प्रास्ताविक डॉ. माने यांनी केले, सूत्रसंचालन संदीप बोडरे यांनी केले. तर डॉक्टर स्नेहल पाटील यांनी आभार मानले. आमदार गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की मला शुगर व बीपी आहे. तरीसुद्धा मी लोकप्रतिनिधी म्हणून कोरोणाची भीती न बाळगता मैदानात उतरलो आहे. लोकप्रतिनिधी आपल्या साठी  काय करतो हे नागरिक लक्षात ठेवतात. एरंडोल तालुक्यात माझ्या राजकीय जीवनाचा पाया भरला आहे.तरी मी येथील जनतेच्या प्रेमाची शिदोरी कदापि विसरू शकत नाही. 
close