इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
दिनांक 23 ऑगस्ट 2020 रोजी वडापुरी येथील सामाजिक व राजकीय नेतृत्व श्री राजेंद्र पाटील यांचा आज 50 वा वाढदिवस त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा
वडापुरी गावचे पाटील स्व. बाबुराव केरुजी पाटील व स्व.यशोदाबाई बाबुराव पाटील हे वडापुरी गावचे पाटील असल्याने त्यांना गावातील सर्व धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान मिळत यामध्ये नागपंचमी कावडीचा मान भैरवनाथ यात्रेतील नैवेद्याचा मान असे.
यांनी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे खजिनदार पद भूषवले तसेच यशोदाबाई पाटील यांनी श्रीनाथ विविध कार्यकारी सोसायटी संचालक पद भूषवले आहे अशा सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती यांचे सुपुत्र श्री राजेंद्र पाटील यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक अध्यात्मिक व राजकीय विचारांचा वारसा घेऊन वडापुरी गावात आपल्या मित्र परिवारामध्ये व पाटील परिवारामध्ये सर्वांना बरोबर घेऊन आपलं सामाजिक व राजकीय वलय तयार केले आहे पाटील हे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वडील व कर्मयोगी शंकराव पाटील यांच्या कृपा छायेणे श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे ग्रंथपाल म्हणून 1997 पासूनआपले कार्य सेवा करीत आहेत तसेच त्यांनी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ वडापुरी या संस्थेचे सचिव म्हणून कार्यही पाहिले आहे. श्री राजेंद्र पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक आहेत त्यांचा सरळ साधा निस्वार्थ स्वभाव व कधीही अहंकार न दाखवणारी ही व्यक्ती माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळखले जाते त्यांनी आपल्या राजकारणात 2019 ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी लढवली आहे.
वडापुरी गावातील जनता त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहत आहेत. आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस असल्याने गावातील व तालुक्यातील त्यांच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जाधव, उपसरपंच ग्रामपंचायत वडापुरी श्री शिवराज गायकवाड प्रो. प्रा शिवराज हॉटेल, श्री लक्ष्मी कृषी सेवा केंद्र चे श्री उमेश शिर्के व नेता जनसामान्यांचा श्री अमोल इंगळे बाभूळगाव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

