सर्वोपतरी मदतीचे कुटुंबियांना आश्ववासन..!!
केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤
पिकअप आणी दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुरंडवाडी येथिल दुचाकीस्वार दोन तरूणांचा मृत्यु झाला होता.दरम्यान तरूणांच्या कुटुंबियांची विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी भेट घेऊण सांत्वण करत सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
केज तालुक्यातील केज-विडा रस्त्यावरील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ विडा येथून घाटेवाडीकडे निघालेल्या पिकअपची आणी त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील धनराज रंगनाथ भोसले (३०) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर सुशेन जालिंदर भोसले (२५) या तरूणाचा केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबिया सह परिसरावर शोककळा पसरली होती.दरम्यान रविवारी दुपारी ११:३० वा.विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी अपघातात म्रत्यु झालेल्या युवकांच्या कुटुंबीयाचे सांत्वण करत सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी देवगाव चे सरपंच व युवा नेते अतुल मुंडे, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी,विठ्ठल भोसले,बारीकराव भोसले, भगवान भोसले उपस्थित होते.


