राजगुरुनगर । प्रतिनिधी ( विद्याधर साळवे )➤ दि.१२
खेड तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मतिमंद मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला असून पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राजगुरुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील एका गावात अल्पवयीन पीडित मुलगी ही जन्मजात मतिमंद असून सहा महिन्यांपूर्वी पीडित मुलीच्या घरातील आई-वडील शेतात कामासाठी गेले असता व दोन लहान बहिणी शाळेत गेल्यावर पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित महेश दौंडकर ( राहणार कनेरसर तालुका खेड ) याने पीडित मुलीच्या घरी व आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत संशयित आरोपीने पीडितेच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने स्वतःच्या घरी तिच्यावर अनेकदा अत्याचार केला व याबाबत कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी पीडितेला देत असे.
काही दिवसांनी पीडित मुलगी आजारी असल्याने आईवडिलांनी तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.त्यानंतर आई-वडिलांनी पीडित मुलीला मोशी येथील चैतन्य महिला संस्था येथे दाखल केले होते.चैतन्य महिला संस्थेने खेड पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली होती.खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांनी पीडित मुलीचे समुपदेशन करून चौकशी केली असता पीडित मुलीच्या घराशेजारील संशयित महेश दौंडकर उर्फ पिंट्या याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला. तसेच याबद्दल कोणास काही सांगितले तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे सांगितले. भीतीपोटी अत्याचार पीडित मुलीने याबाबत कोणास काही सांगितले नाही. मात्र पीडिता सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने या कृत्यास वाचा फुटली याबाबत संशयित आरोपी महेश दौंडकर याच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीवर बलात्काराचा आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला असल्यामुळे आरोपीला कठोर शासन करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी राजगुरुनगर पोलिसांकडे केली आहे.या घटनेचा पुढील तपास खेड उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, हवालदार बाळकृष्ण साबळे, महिला पोलीस हवालदार सुरेखा भोर करत आहेत.