शिर्डी एक्सप्रेस सेवा ➤
मुंबई:- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी रात्री त्याच्या निकटवर्तीय मित्रांनी त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याची माहिती दिली. अद्याप संजय दत्तने यावर काहीच भाष्य केले नाही. आपण काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले होते.
चित्रपटातून काही काळ ब्रेक घेणार असल्याचे त्याने इन्स्टाग्राम आणि टि्वटरवर पोस्ट केले होते. मित्रांनो, वैद्यकीय उपचारांसाठी मी चित्रपटातून काही वेळ ब्रेक घेणार आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार माझ्या सोबत आहेत. माझ्या तब्येतीची काळजी करु नये मी लवकरच बरा होऊन परत येईल, असे आवाहन त्याने चाहत्यांना केले होते.
दरम्यान, श्वसनास त्रास होत असल्यामुळे ज्यावेळी संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची ऑक्सिजन पातळी ही 90-92 टक्के यादरम्यान होती. त्यावेळी त्याची त्वरीत कोविड-19ची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात येते.