shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कला-समृध्दी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 ..; मुंबई मध्ये मराठी चित्रपटांसाठी निःशुल्क प्रवेश...!!



कला-समृध्दी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 मुंबई... 


खरंतर "कला" ही कुणाला जन्मजात उपजत लाभलेलं वरदानच असतं,  तर कधी आपण त्याच योग्य प्रशिक्षण घेऊन संपादन करत असतो, 




अश्याच भारतातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे, आणि बालक,तरूण,वयोवृद्ध सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं सिनेक्षेत्र,, या क्षेत्रात आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी, कलाकार मंडळी आपलं सर्वस्व पणाला लावत असतात, पण कधीकधी सम्पूर्ण आयुष्य संपलं तरी योग्य लोकांना , योग्य लोकांन पर्यंत पोहचताच येत नाहीत, कधी कधी कितीतरी तरुण कलाकार कुठल्यातरी आमिषाला बळी पडून, स्वतःच सर्वच गमावून बसतात, स्वतःच, अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सध्या शॉर्टफिल्म हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे असं म्हणायला हरकतच नाही,

कारण नागराज मंजुळे ने सुदधा सर्वात पहिले आपली कलाकृती पिस्तुल्या या शॉर्टफिल्म च्या माध्यमातून मांडली होती. अश्याच ध्येयवेड्या खास करून ग्रामीण भागातील कलाकारांची प्रतिभा, जगासमोर मांडण्यासाठी, योग्य लोकांना योग्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी  कला-समृद्धी ने कलाकार घडविण्याचा विडाच उचलला आहे,
2018 मध्ये सर्वप्रथम कला- समृध्दी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना करून, त्या मध्ये तब्बल 72 लघू चित्रपट निर्मात्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं, 2018 मध्ये या महोत्सवासाठी 209 लघुपट, 31 देश 18 राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्यामधून चित्रपट निर्मात्यांनी या मध्ये आपला सहभाग नोंदविला होता..

आज 2019 मध्ये तर या ध्येयवेड्या तरुणांची चर्चा संपूर्ण जगभर झाली होती, 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या वर्षी  खास मराठी features films, short films, music videos, Documentary film, आणि वेबसिरीज निर्मात्यासाठी निःशुल्क प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती रमेश पवार यांनी दिली. 2019 मध्ये तब्बल 72 देशातील भारतातून 22 राज्यातील, आणि महाराष्ट्र राज्यभरातून तब्बल 400 पेक्षा जास्त चित्रपट निर्मात्यांनी यात आपला सहभाग नोंदविला होता.. त्या पैकी 136 शॉर्टफिल्म्स, Documentary films, music videos, web-series ची यासाठी निवड करण्यात आली होती,

या वर्षी ही असाच प्रतिसाद आहे, खास , महिला सशक्तीकरण, बेटी बचाओ,बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, कोरोना काळ अश्या  सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या लघु चित्रपट तथा डॉक्युमेंटरी फिल्म्स ना विशेष पुरस्कार असेल, या महोत्सवासाठी समीक्षक म्हणून बॉलीवूड चे दिग्गज सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक, कला-दिग्दर्शक, निर्माते, आणि मीडिया एंटरटेनमेंट क्षेत्रातील दिग्गज आदरणीय मंडळी असून यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होणार आहे.

ग्रामीण भागातील एखादा प्रतिभावंत छोटासा कलाकार असो, किंवा तामिळ तेलगू बंगाली बॉलीवूड चा दिगग्ज निर्माता असो, दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणण्याच कामं हे कला-समृध्दी च्या माध्यमातून ही मंडळी करत आहेत.. खरंतर हा महोत्सव 1 मे ला महाराष्ट्र दिनी करण्यात येणार होता, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तरी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेणे म्हणजे केवळ एक औपचारिकता असल्याच मत शिर्डी एक्सप्रेस शी बोलतांना महोत्सवाचे संस्थापक रमेश पवार यांनी व्यक्त केलं.

दर वर्षी प्रमाणे शक्यतो या वर्षीही महोत्सवासाठी बॉलीवूड तामिळ, तेलगू , बंगाली, उडिया, भोजपुरी, मराठी, व टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील दिग्गज निर्मात्यांच्या उपस्थितीतच हा पुरस्कार वितरण सोहळा होईल अशी आयोजकांची अपेक्षां आहे. हा महोत्सव म्हणजे नवीन कलाकार  मंडळी साठी संजीवनीच असेल यात काही शंकाच नाही..

आयोजन हे प्रतीक्षा मुव्हीज चं असून मीडिया पार्टनर म्हणून शिर्डी एक्सप्रेस आहेत.
महोत्सवाच्या कुठल्याही माहितीसाठी आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता,
रमेश पवार (संस्थापक अध्यक्ष)
9930441312
close