shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मालवाहूक पिकप वाहन उलटले १९ मंजुर जखमी तर ६ गंभीर..!!

शिर्डी एक्सप्रेस सेवा ➤ 
गडचिरोली,ता.१२: धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने १९ मजूर जखमी झाले. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कुरखेडा-मालेवाडा मार्गावर सालईटोला गावानजीक घडली. जखमींमध्ये १३ महिलांचा समावेश असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.


                       
सर्व मजूर कुरखेडा तालुक्यातील वाघेडा येथील रहिवासी आहेत.हे सर्व जण वाघेडा येथून एका पिकअप वाहनाने येंगलखेडा येथे  धान रोवणीच्या कामासाठी जात होते. दरम्यान सालईटोला गावाजवळ वाहन चालकाचे संतुलन बिघडल्याने वाहन उलटले.त्यात पिंकी दरवडे(१८), जयंत दरवडे (२०), संगीता दरवडे(३८), कविता देव्हारे (३६), रामू देव्हारे (४०) ,यादव शेंडे (३५) ,हिना शेंडे (३०), कुसूम नागोसे (५०), मोनिका दरवडे (२०) ,गणेश नेवारे (२१), पूनम पंधरे (२०), गीता देव्हारे (४०), गुड्डू नेवारे (३०) ,सचिन मुंगणकर (२२), गोपिका दुमाने (४०), योगिता राऊत (३५), दर्शना सहारे (२५), इंदू मंडकाम (४०), सरिता मेश्राम (३५) यांचा समावेश आहे.
                       
पिंकी दरवडे, यादव शेंडे, कुसूम नागोसे, मोनिका दरवडे, गणेश नेवारे व सरिता दुमाने या सहा जणांची प्रकृती गंभीर असून, कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
                       
अपघाताचे वृत्त समजताच भाजपचे तालुकाध्यक्ष नाजुक पुराम, माजी तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
close