shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनेकांनी केली कोरोना चाचणी. पहिल्याच दिवशी व्यावसायिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..!!


लातूर ।  प्रतिनिधी (रवि बिजलवाड ) ➤   दि. १२
लातूर शहर महानगरपालिकेच्या अँन्टीजन किट्स द्वारे व्यावसायिकांच्या कोरोना चाचण्या करण्याच्या महत्वकांक्षी अभियानाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक चाचणी केंद्रावर शेकडो नागरिकांनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करत अक्षरशः रांगा लावून कोरोना चाचण्या करून घेतल्या. ही बाब शहर कोरोना मुक्त करण्यासाठी लातूरकरांची असलेली बांधिलकी दर्शवते.




एक महत्त्वाची सूचना; दिनांक १२ व १३ ऑगस्ट रोजी केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या घटकांचीच म्हणजे किराणा, दूध, भाजीपाला, फळे, मांस, औषधे, पेट्रोल, गॅस, पाणी, बर्फ याव्यावसायाशी निगडित विक्रेते व कर्मचारी व आरोग्य सेवक यांच्याच चाचणी करण्यात येणार असून इतर व्यापाऱ्यांनी गर्दी टाळावी.

ॲंटीजेन चाचणी करून घेण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या संबंधित व्यवसायिक, विक्रेते यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचा पुरावा आवश्यक आहे. व्यवसाय परवाना अथवा असोसिएशनने दिलेले कार्ड अथवा कर पावती किंवा अत्यावश्यक सेवेशी निगडित असल्याचा कुठलाही पुरावा व्यवसायिक व विक्रेत्यांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे.


close