मुरूड-प्रतिनिधी : विकास मेहेतर
समाजकारणासाठी राजकारण करणारा एक तरुण तडफदार हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे आपुलकीने, अभिमानाने व आदराने पहावे असे ज्यांचे व्यक्तीमत्व आहे तो तरुण युवक म्हणजे अलिबागचे शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मागील गेली दोन वर्षे भरीव कामगिरी करणारे प्रत्येकाच्या हृदयात एक मित्रत्वाची जागा निर्माण करणारा कार्यक्षम कार्यकर्ता म्हणजेच राजाभाई केणी आज २५ ऑगस्ट २०२० रोजी शिवसेना तालुका प्रमुख या पदावर दोन वर्षे पुर्वी शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांनी २५ ऑगस्ट २०१८ रोजी अलिबाग तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती केली त्यानिमीत्ताने घेतलेला हा आढावा. राजाभाई केणी यांचे मुळ जन्मगाव हेमनगर. अतिशय गरिब घराण्यात जन्मलेला हा तरुण. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना कधीकाळी समाजात आपल्या स्वकर्तुत्व व कार्यकर्तूत्वाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनामनात घर निर्माण करुन समाजासमोर स्वत:ला सिद्ध करुन एक आदर्श निर्माण करेल असे वाटलेच नव्हते. परंतू गरिबीचे चटके खावुन पोळलेला हा तरुण युवा अगदी सर्वसामान्य कुटुंबातून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. गरीबीची जाण असल्यानेच गरिबांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावतो, त्यांचे प्रश्न जवळून पहातो, अनुभवतो व समजून घेतो अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, स्वाभिमानाचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी समवैचारिक प्रेरणेने भारावलेले काही मित्र एकत्र येतात व हेमनगर येथे संस्थापक राजाभाई केणी यांच्या पुढाकाराने १९९९ साली शिवनेरी ग्रुपची स्थापना केली जाते. याचेच फलित असे कि, गेली २१ वर्षे शिवनेरी ग्रुपच्या सौजन्याने शिवजयंतीनिमीत्त भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ज्याची किर्ती केवळ हेमनगर व पंचक्रोशीतच नव्हे तर संपुर्ण रायगड जिल्ह्यात होत आहे. समाजकार्यातूनच अनेक सामाजिक कार्य करीत असतानाच गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचे वाटप, मोफत नेत्र तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवून आज राजाभाई हे गरीबजनांचे आधारस्तंभ बनले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून कबड्डी व क्रिकेट खेळांच्या माध्यमातून उत्कृष्ठ दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे म्हणून पुरुष व महिलांचे जिल्हा स्तरीय कबड्डी व क्रिकेट चे आयोजन केले. व प्रकल्पग्रस्त शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी मोठे आंदोलन केले. त्याचबरोबर राजाभाई केणी यांनी २००२ मध्ये विष्णू भाई पाटील यांनी शिक्षक सेवकांच्या भरतीसंदर्भात छेडलेल्या न्याय आंदोलनात सहभागी होवून महत्वपूर्ण कामगिरी बजावत असताना स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्यासाठी त्यांनी वेळेप्रसंगी लाठीमारही सहन केला व जेलमध्ये जावून कित्येक खटले देखिल त्यांच्या नावावर दाखल झाले आहेत परंतू न डगमगता व कोणत्याच गोष्टींचा, नुकसानीचा विचार न करता केवळ गरीबांना व सुशिक्षित बेरोजगाराना न्याय मिळावा हा एकच उद्देश समोर ठेवून त्यांनी आपले सामाजिक कार्य अविरतपणे चालू ठेवले. नेटको कंपनीने केलेल्या मनमानी कारभाराविरोधात जावून आक्रमक पवित्रा घेवुन राजाभाई केणी यांनी कामगारांना नुकसान भरपाई मिळवून दिली. मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली २५३ जोडप्यांचा सामुहिक विवाहाचा स्तुत्य उपक्रम राजाभाई केणी यांनी राबविला. यावेळी त्या जोडप्यांना संसारास उपयोगी सर्व वस्तूंचे वाटप व आर्थिक मदत करुन समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य पुर्ण केले. विभागातील गरीब गरजू जनतेला अडीअडचणीच्या वेळी आजारपणात विना अडथळ्याशिवाय सहज दवाखान्यांत जाता यावे यासाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. सामाजिक कार्यामध्ये त्यांना मा. विष्णू भाई पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे कोकण चे भाग्यविधाते देशाचे माजी केंद्रीय मंत्री मा.अनंत गिते साहेब यांच्या पाठिंब्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडुन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे धरमतरखाडी परिसरातील बेकायदा रेती उत्खननाविरोधात राजाभाई केणी यांनी केलेल्या आंदोलनामुळे संबधितांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतक-यांना दिलासा मिळाला.
अशी एक ना अनेक समाजविरोधात काम करणा-यांच्या मुसक्या आवळून परिसरात व संपुर्ण जिल्ह्यातच आपला एक दरारा निर्माण केला आहे. फक्त हा दरारा व दहशत जनसामान्यांना न्याय मिळावा यासाठी आहे असेही ते मिश्किलपणे म्हणतात. नुकत्याच झालेल्या सन २०१९ मध्ये मूरुड अलिबाग मतदार संघातून मा.महेंद्र दळवी हे आमदार म्हणून निवडून यावे याकरिता दिवसरात्र एक करुन अनेक कार्यकर्त्यांना एकत्र आणुन तसेच प्रसंगी गनिमी काव्याचा वापर करुन विरोधकांना देखील आपल्या बाजुने वळवून अगदी काही थोड्या थोडक्याच कालावधीत असा काही कायापालट केला कि, गेली 50 वर्षे शेकाप च्या ताब्यात असणा-या व शेकाप चा बालेकिल्ला म्हणून समजणा-या समस्त ग्रुपग्राम पंचायतींवर भगवा झेंडा फडकावला व विरोधकांना नेस्तनाभूत करुन सळो की पळो करुन सोडले. सुरुवातीला एक सर्वसामान्य नागरिक, त्यानंतर कार्यकर्ता, पुढारी, नेता अशा चढत्या क्रमाने पुढे पुढे जात असतानाच शिवनेरी ग्रुप हेमनगर चे संस्थापक, सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीचे चेअरमन,पोयनाड विभाग सातबारा शेतकरी संघटनेचे विभाग अध्यक्ष, अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख तसेच कूसुंबळे ग्रुपग्रामपंचायत सदस्य अशा वेगवेगळ्या पदांवर जरी कार्यरत असले तरी मुळ उद्देश जनसामान्यांना न्याय देणे व गोरगरीबांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढणे हाच असतो. २०२० मध्ये कोरोनासारख्या महामारीने संपुर्ण जगालाच हादरुन सोडले असताना खेडोपड्यातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला परंतू त्या काळातही खुप अनमोल अशी भरीव कामगिरी करित आदिवासीपाड्यांवरील एकही घर न वगळता सर्वांनाच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले व आरोग्यविषयक सतर्कता बाळगून गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले व हे कार्य आजही तत्परतेने चालू ठेवले आहे. संकट, आपत्ती व परिस्थिती कोणतीही असो त्यामध्ये निर्भीडपणे उभे राहून मार्ग काढून अनेकांचा आधारवड असणारे राजाभाई केणी यांना शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख पदावर नियुक्त होवून आज पहाता पहाता २ वर्षांचा कालावधी सरला आहे आणी या २ वर्षांच्या कारकिर्दीत विधानसभेवर भगवा झेंडा फडकवून अलिबाग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती विरोधकांकडून हिसकावुन घेवुन जनसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत ही निश्चितच प्रत्येक शिवसैनिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या सहकार्याने, मा. अनंत गीते व पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या सततच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली येत्या काळातही अशीच उत्तरोत्तर कामगिरी करुन तालुक्यात शिवसेना संघटनेचे काम करुन गाव तिथे शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक अशी सद्य परिस्थीती निर्माण करनारे राजाभाई केणी हे जनसामान्यांसाठी एक आदर्श निर्माण करतील यात तिळमात्र शंका नाही.
त्यांच्या या कर्तुत्वाला व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
"गरिबीने पोळले, कर्तुत्वाने झेलले
झडप मारु पहाता अनेकांनी ओरबाडले,
गोरगरीबांच्या आशीर्वादाने भाईला तारले
वाघाच्या बच्छडयाने समाजकंटकांना हरविले.
जे.एस.पाटील
कुसुंबळे- अलिबाग.

