shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी पोलिसांसह इतर यंत्रणेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आज अचानक सायंकाळी बसस्थानकात केले प्रात्यक्षिक..!!

सावळीविहीर(प्रतिनिधी) :  शिर्डी परिसरात किंवा आसपासच्या शहरातजर अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीला हाताळण्याकरिता पोलीस दल, अग्निशामक दल, वैद्यकीय पथक व इतर सर्व यंत्रणा सक्षम असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिर्डी बस स्थानकासमोर दंगा काबू योजनेचे शिर्डी पोलीस व अग्निशामक दलाच्या वतीने प्रात्यक्षिक घेण्यात आले. अचानक हे मॉकड्रील घेण्यात आले. व  सर्व दल व वैद्यकीय पथक तात्काळ येथे घटनास्थळी दाखल झाल्या होते.

यावेळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस आधिकारी सोमनाथ वाकचौरे ,तहसीलदार कुंदन हिरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले,प्रशांत कंडारे,प्रविणकुमार दातारे ,शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक प्रमुख विलास लासुरे आदी उपस्थित होते. शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. दिवसेंदिवस शिर्डी शहराची लोकसंख्या वाढत आहे. शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे व वाढत आहे.शिर्डी शहरासह परिसरातील गावांचा ही मोठ्या प्रमाणात विकास होत असून बाहेरील जिल्ह्यातील, बाहेरच्या राज्यातील अनेक लोक कामधंदा निमित्त रोजीरोटीसाठी शिर्डी व परिसरात राहण्यास येत आहेत.त्याचप्रमाणे अनेक काही अपप्रवृत्तीचे ,गुन्हेगारी वृत्तीचे लोकही आपल्या जिल्ह्यातून, परराज्यातून शिर्डी व परिसरात येत आहेत, त्यामुळे शिर्डी व परिसर हा मोठा संवेदनशील असा झाला आहे.

 त्यामुळे भविष्यात शिर्डी व इतर आसपासच्या शहरात जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली. जर अचानक काही दंगली सारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा आग लागली,बेकाबु जमाव होऊन काही अनर्थ होत असेल तर अशा जमावाला किंवा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस दल, अग्निशामक दल ,वैद्यकीय पथक, सर्व सक्षम असायला हवेत, तत्पर असायला हवेत, या हेतूने शिर्डी बस स्थानका च्या मैदानात अचानक आज मॉक ड्रिल घेण्यात आले. या वेळी शिर्डी बस स्थानकात आग लागल्याचे फोन अग्निशामक दल ,पोलीस दल, वैद्यकीय पथक ,संस्थांनचे पथक आदींना करण्यात आल्यानंतर तात्काळ सर्व दल ,अधिकारी व  कर्मचारी तातडीने बस स्थानकाच्या घटनास्थळी दाखल झाले.अग्निशामक बंबतुन घटनास्थळी पाण्याचा फवारा करण्यात आला.असे प्रत्यक्ष प्रत्यक्षिक आज  सायंकाळी करण्यात आले.

 हे मॉकड्रील होते. मात्र वेळेवर सर्व दल सक्षम आहेत की नाही हे पाहण्यासाठी हे प्रात्यक्षिक आज घेण्यात आले. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्याचप्रमाणे कोरोणा संदर्भातही मोठे जनजागृती होत आहे. शिर्डीत सध्या साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे.मात्र ते काही दिवसांनी सुरू झाल्यानंतर पूर्वीप्रमाणेच येथे साईभक्तांचाओघ व गर्दी वाढणार आहे.त्यामुळे येथे काही अनुचित प्रकार होऊ नये,). यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे व यातून हे मॉकड्रिल घेण्यात आले. असे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी यावेळी सांगितले, या मॉकड्रील साठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच साईबाबा संस्थानचे वैद्यकीय पथक, शिर्डी नगरपंचायतीचे अग्निशामक बंब व कर्मचारी, श्री साईबाबा संस्थान चा अग्निशामक बंब व कर्मचारी, घटनास्थळी  उपस्थित होते.  येथे यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना अचानक शिर्डी बस स्थानकात काय झाले आहे ,हे पाहून प्रथम तेही अवाक झाले होते .मात्र नंतर हा प्रात्यक्षिकाचा, सरावाचा भाग असल्याचे कळताच यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सुस्कारा सोडला.
close