shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशी गायीचे पूजन व वृक्षारोपण करून श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा वाढदिवस केला साजरा..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी वरकुटे खुर्द मासाळ मिसाळ वस्ती या ठिकाणी माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष मित्र सचिन मासाळ यांनी आतापर्यंत दहा हजार झाडे लावली होती आज १०००१या झाडाचे वृक्षारोपण व देशी गायीचे पूजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वृक्षमित्र सचिन मासाळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले की माननीय श्री हर्षवर्धनजी भाऊ पाटील यांच्या  वाढदिवसाबद्दल आगळावेगळा कार्यक्रमाने आम्ही साजरा केला या वाढदिवस निमित्त सलग तीन वर्षे रक्तदान केलेले आहे.









तसेच हिंदू धर्माचे प्रतीक मानले जाणारे देशी गायीचे पूजन करून तिला खाऊ चारा देऊन तिचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे देशी गाय ही बहुगुणी आहे तिचं संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तिचं पूजन होणे अत्यंत गरजेचे आहे यातून देशी गाय बद्दल आदर भाव निर्माण व्हावे हा कार्यक्रम मासाळ मिसाळ वस्ती च्या ग्रामस्थ साह्याने मी कार्यक्रम घेतलेला आहे . आलेल्या मान्यवर यांच्या हस्ते 10001 या वृक्षाचे वृक्षारोपण या ठिकाणी घेतलेला आहे माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त त्यांचेआयुष्य लाभो व पुढील वाटचालीस भरभराट समृद्धी लाभो अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो.

या कार्यक्रमा दिवशी दिवसभर उपवास करून नंतर झाडे लावण्याचा कार्यक्रम  श्री सचिन मारुती मासाळ यांनी केला वृक्षमित्र सचिन मासाळ हे शेतकऱ्याचा मुलगा आहे साहेबांच्या कार्याला यश लाभावे या साठी असे कार्यक्रम करत आहेत. यावेळी गावातील काही ग्रामस्थ मान्यवर आणि घरातील सदस्य मंडळी उपस्थित होते सदरपरिवाराची कुटुंबप्रमुख सन्माननीय श्री.धनाजीराव मासाळ श्री. विठ्ठलराव मासाळ ग्रामसेवक श्री. ज्ञानदेव मासाळ श्री.सुभाष दडस श्री.मंगेश मासाळ कृषी पदवीधर श्री.शिवराज मासाळ सौ.मनीषा मिसाळ अंगणवाडी ताई मदतनीस. मासाळ मिसाळ वस्ती सौ.सुलोचना मासाळ सौ.ललिता ताई मासाळ सौ. अहिल्या मासाळ श्री.मारुती विश्वनाथ मासाळ सौ.सुनिता मारुती मासाळ लहानथोर मान्यवर उपस्थित होते.

वृक्ष मित्र श्री सचिन मासाळ हे मनोगत व्यक्त करीत असताना वृक्षांची व देशी गाई यांच्या सविस्तर माहिती  सांगताना यांच्या संवर्धना पोटी ते भाहुक झाले होते.हे पाहून उपस्थितांचे  अश्रूंनी डोळे पाणावले होते
close