प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोलापूर -जगात कोरोना या रोगाने थैमान घातला असून कोरोना बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार ने जनतेसाठी केलेले वेळोवेळी आवाहन आदेश निर्देश सूचना आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हूणन अनेक पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून व कुटूंबाला बाजूला सारून जीवघेण्या कोरोना च्या बातम्या केल्या आहेत परंतु अश्या पत्रकारांबाबत राज्य सरकार कमालीचे उदासीन असून पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना कोरोची काळात मृत्यू झाल्यास तातडीने मोठी आर्थिक मदत करण्यात येते परंतु कोरोना काळात एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत करण्यास राज्य सरकार चालढकल करत आहे ही बाब अतिशय गंभीर असून कोरोना बाबत कुटुंबाला बाजूला सारून जीव धोक्यात घालून बातम्या करत असताना मृत्यू झाला तरी सरकार मदत करत नसेल तर बातमी करायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दैनिक सकाळ चे पत्रकार विजयकुमार सोनवणे यांचे कोरोना संक्रमण काळात सोलापूर येथील हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी निधन झाले असून त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत देण्यात यावी म्हूणन *पत्रकार सुरक्षा समिती वतीने मुख्यमंत्री यांना दिनांक 27/7/2020* रोजी यांना निवेदन सादर करण्यात आले होते परंतु मुख्यमंत्री कार्यालय ने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही तदनंतर *पत्रकार सुरक्षा समिती वतीने 6/8/2020* रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली होती यावेळी पत्रकार बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.
मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून देखील पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याने राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी *पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद समोर दिनांक 5/9/2020रोजी भीक मांगो आंदोलन करणार असून* या भिकेतून मिळालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी ला जिल्हाधिकारी मार्फत दिली जाणार आहे.
या भीक मांगो आंदोलनास परवानगी देण्यात यावी म्हूणन पत्रकार सुरक्षा समिती वतीने सदर बाझार पोलीस ठाणे यांना पत्र सादर केले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार सचिव अरुण सिडगिड्डी अक्षय बबलाद बिपीन दिड्डी अशोक माचण विश्व्जीत कारंडे, इम्तियाज अक्कलकोटकर महंमद शेख इस्माईल शेख प्रसाद ठक्का इत्यादी उपस्थित होते.

