shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे अनुदान व संकट काळात अपंग व्यक्तींना शासनाकडून मंजूर झालेले वाढीव अनुदान त्वरित वितरण करण्यात यावे...!!

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे अनुदान व संकट काळात अपंग व्यक्तींना शासनाकडून मंजूर झालेले वाढीव अनुदान त्वरित वितरण करण्यात यावे...!!

 लातूर। प्रतिनिधी (रवि बिजलवाखड) :
दि.२२/०८/२०२०

उदगीर तहसील कार्यालय मार्फत संजय गांधी निराधार योजने अंतर्गत शहर व उदगीर तालुक्यातील दिव्यांग बांधव,विधवा महिला, निराधार स्त्री ,पुरुष व जेष्ठ नागरिकांना जे महिना 1000 रुपये मानधन पगार स्वरूपी  मिळतो तो गेली तीन महिने झाली अद्यापही वाटप झालेले नाही. 

त्याचप्रमाणे कोरोना महामारी संकटामुळे दिव्यांग, निराधार महिला.व जेष्ठ नागरिकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे व आर्थिक संकटामुळे होणारी हेळसांड थांबवावी मा.मे .साहेबांनी संबंधित बँकेस सुचना देवुन मिळणारे मानधन त्वरित वितरण करून दिव्यांग, निराधार महिला व जेष्ठ नागरिकांना न्याय दयावा. दि.30/8/20 पर्यंत सबंधितांना अनुदान वितरण करण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जनआदोंलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
close