केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) :-
दूषित पाणी बंद न झाल्यास न प समोर आंदोलन - रोडे चिंचोलकर..!!
केज नगरपंचायत आतर्गत अनेक दिवसापासून होणारा दूषीत पाणी पुरवठा बंद करा या मागणी साठी नगरपंचायत ला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे,
केज नगरपंचायत ला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो हे पाणी अत्यंत दूषित असून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर तुरटी ही टाकत नसल्याचे म्हटले आहे, केज शहरांमध्ये पाइपलाइन जागो जागी लिकेज आहेत.पाणी बंद केल्या नंतर नालीचे पाणी पाईप लाईन मध्ये जाऊन ते आठ दिवस साचलेले पाणी सोडलं की तेचं पाणी बाहेर येते या मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दूषित पाणीपुरवठा बंद करावा जिथे लिकेज आहे तिथली लिकेज काढून घ्यावेत, पाण्यामध्ये तुरटी ब्लिचिंग पावडर वापरावे,या मागणीचे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केज नगरपंचायत ला निवेदन देण्यात आले असुन आठ दिवसांमध्ये दूषित पाणी पुरवठा बंद न झाल्यास शेकापच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा भाई अशोक रोडे,श्याम चिंचोलीकर, निखिल बचुटे, कपिल कुरेशी, शेबाज फारोकी ,रजनीकांत वाघमारे इत्यादींनी निवेदनातून इशारा दिला आहे, निवेदना वर भाई अशोक रोड शामराव चिंचोलकर निखिल बचुटे कैफील कुरेशी रंजिकांत वाघमारे स्वाक्षर्या आहेत,

